Home | Jeevan Mantra | Dharm | Vidur policy life management of Mahabharata

3 काम, ज्यामधून कमावलेला पैसा तुम्हाला फक्त दुःखच देतो

रिलिजन डेस्क | Update - Nov 11, 2018, 12:05 AM IST

असा पैसे जो खूप त्रास सहन करून किंवा चुकीचे काम करून मिळाल्यास तुम्हाला सुख देत नाही

 • Vidur policy life management of Mahabharata

  महाभारताचे एक खास अंग म्हणजे विदुर नीती. यामध्ये महात्मा विदुर यांनी काही खास कामाच्या नीती सांगितल्या आहेत. या गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. जो व्यक्ती या नीतीचे पालन करतो त्याला जीवनात सर्व सुख आणि यश प्राप्त होऊ शकते. विदुर नीती अंतर्गत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणते काम केल्यानंतर कमावलेला पैसा तुम्हाला गरीब बनवू शकतो...


  श्लोक
  अतिक्लेशेन येर्था: स्युर्धर्मस्यातिक्रमेण वा।
  अरेर्वा प्रणिपातेन मा स्म तेष मन: कृथा:।।


  अर्थ : जे धन प्राप्त करण्यासाठी असहनीय कष्ट करावे लागले असतील, धर्माचा मार्ग सोडवा लागला असले, शत्रूसमोर खाली पाहण्याची वेळ आली तर असे धन व्यर्थ आहे. अशा प्रकारचे धन जवळ ठेवल्यास व्यक्ती हळू-हळू गरीब होऊ लागतो.


  1. खूप जास्त क्लेश म्हणजेच एखाद्याशी वाद घालून किंवा दुःख देऊन असा पैसा तुम्ही घरी घेऊन जात असाल तर यामुळे कुटुंबामध्ये वादाची स्थिती निर्माण होते. यामुळे अशा पैशांपासून दूरच राहावे.


  पुढील स्लाईडवर वाचा, श्लोकाचा सविस्तर अर्थ...

 • Vidur policy life management of Mahabharata

  2. धर्माचे उल्लंघन म्हणजे चुकीचे काम करून कमावलेला पैसा आयुष्यात कधीही प्रगती होऊ देत नाही. असा पैसा त्याचे अपत्य नष्ट करते. यामुळे चुकीच्या पद्धतीने पैसा कमावू नये.

 • Vidur policy life management of Mahabharata

  3. शत्रूसमोर मान खाली घालून म्हणजेच तुमचे एखाद्याशी काहीही पटत नसल्यास, त्याचे बोलणे खाऊन त्याच्यासोबत काम करून पैसा येत असेल तर तो पैसा तुम्हाला गरीब बनवू शकतो.

Trending