आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा, सुंदर पत्नी आणि आज्ञाधारक मुलासहित या 6 गोष्टी असलेला व्यक्ती कधीही दुःखी होत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख ये-जा करती असतात. यामुळेच म्हटले जाते की, कोणताही व्यक्ती पूर्णपणे सुखी राहत नाही. कोणती न कोणती कमतरता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अवश्य असते, परंतु महाभारतातील एक प्रसंगामध्ये महात्मा विदुर यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो कधीही दुःखी राहत नाही म्हणजेच भाग्यवान असतो. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुर यांनी या युगात सहा प्रकारचे सुख सांगितले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत...


श्लोक
अर्थागमों नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च।
वश्यश्च पुत्रो अर्थकरी च विद्या षट् जीव लोकेषु सुखानि राजन्।


अर्थ -1. धन, 2. निरोगी शरीर, 3. सुंदर पत्नी, 4. जी प्रिय बोलणारी असेल, 5. मुलगा आज्ञाधारक असणे, आणि 6. धन मिळवून देणाऱ्या विद्येचे ज्ञान असणे. या सहा गोष्टी मनुष्याला सुख देतात.


धन
सुखी जीवनासाठी पैसा असणे खूप आवश्यक आहे. पैसा नसेल तर मान मिळत नाही आणि यशही. कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी धन आवश्यक आहे. सध्याच्या काळात शिक्षण घेण्यासाठीसुद्धा भरपूर पैसा लागतो. पैसे नसेल तर एखाद्या आजारी व्यक्तीवर उपचार करणेसुद्धा शक्य नाही. वृद्धावस्थेमध्ये पैसाच सर्वात मोठा आधार असतो. जीवनात धनाची आवश्यकता सर्वात जास्त म्हातारपणातच असते.


निरोगी (स्वस्थ) शरीर -
जीवनात सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित काही खाऊ-पिऊ शकत नाहीत. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जीवनातील अनेक सुखांपासून वंचित राहू शकता. जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्याचेही त्रास सहन करावा लागतो. आजार मोठा असेल तर दवाखाना, औषधी इ. गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम असतो. गरज पडल्यास तो शारीरिक श्रम करू शकतो, याउलट रोगी व्यक्ती हे करू शकत नाही. यामुळे शरीर निरोगी असणे आवश्यक आहे.


3. सुंदर पत्नी, 4. जी प्रिय बोलणारी असेल
महाभारतामध्ये महात्मा विदुर यांनी पत्नीला तिसरे आणि जर ती गोड बोलणारी असेल तर चौथे सुख सांगितले आहे. पत्नी सुंदर असेल तर तुमचे मन बाहेर भटकणार नाही आणि या स्थितीमध्ये करण्यात आलेल्या पापांपासून तुम्ही दूर राहू शकतो. सुंदर पत्नी जर गोड बोलणारी असेल तर दुग्धशर्करा योग समजावा. गोड म्हणजे सर्वांशी नम्रतापूर्वक संवाद साधून ती कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रभावित करू शकते. कुटुंब आनंदी असेल तर तुम्ही स्वतः प्रसन्न राहू शकता. पत्नी कटू बोलणारी असेल तर पती-पत्नीमध्ये दररोज कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद होऊ शकतात. यामुळे पत्नी सुंदर आणि गोड बोलणारी असेल तर व्यक्तीला दुःखी राहवे लागत नाही.

बातम्या आणखी आहेत...