आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदुर निती: बुद्धिमान, हेल्पिंग नेचर, मनावर ताबा ठेवून कमी बोलणारे मिळवू शकतात Fame! आपल्यात आहे का या 8 पैकी एकही गुण?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - महात्मा विदुर महाभारतातील प्रमुख पात्रांपैकी एक होते. ते धृतराष्ट्रचे भाऊ आणि त्यांचे मंत्री सुद्धा होते. महात्मा विदुर यमराजचा अवतार होते. त्यामुळेच वेळोवेळी आपल्या धोरणांच्या माध्यमातून ते धृतराष्ट्रला समजावून सांगत होते. जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध पेटले, तेव्हा विदुरने धृतराष्ट्राला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ज्या गोष्टी त्यांनी धृतराष्ट्रला सांगितल्या, त्यालाच विदुर निती असे म्हटले जाते. विदुर निती आजच्या घडीला प्रासंगिक आहे. विदुर नितीमध्ये आम्ही आपल्याला सांगत आहोत की ती कोणती 8 वैशिष्ट्ये आणि गुण आहेत जी माणसाला प्रसिद्धी आणि फेम देऊ शकतात. 


अष्टौ गुणा: पुरुषं दीपयन्ति, प्रज्ञा च कौल्यं च दम: श्रतुं च!
पराक्रमश्चबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥


अर्थात- निम्नलिखित आठ गुणांनी मनुष्याची प्रशंसा केली जाते. यात 1. बुद्धी, 2. सद्वर्तन, 3. मनावर संयम, 4. ज्ञान, 5. धाडसी, 6. कमी बोलणे, 7. यथाशक्ती दान करणे आणि 8. दूसऱ्यांनी केलेल्या उपकार सदैव लक्षात ठेवणे.


1. बुद्धी
जी व्यक्ती आपल्या बुद्धीचा चांगल्या प्रकारे वापर करते ती आपल्या आयुष्यात यशस्वी ठरते. जी व्यक्ती विचार न करता कामे करत राहतात त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. 


2. सद्वर्तन, इतरांची मदत करणारा
जी व्यक्ती आपल्या वागण्यात सहज आणि सरळ असते. ते इतरांना मदत करून आणि चांगल्या स्वभाव गुणांमुळे प्रसिद्धी मिळवतात. यापेक्षा उलट वर्तन ठेवणारे लोक कुणालाही प्रिय वाटत नाहीत.


3. मनावर ताबा ठेवणारा
ज्या माणसाचा आपल्या मनावर अर्थात आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवता येतो तो साधूसारखा असतो. अशी माणसे भटक्या लोकांना योग्य मार्ग दाखवतात. याच कामातून ते दुसऱ्यांचे गुरू आणि प्रसिद्ध व्यक्ती होतात. 


4. ज्ञान
ज्ञान अर्थातच नॉलेज ज्या व्यक्तींकडे असते ते कुठल्याही परिस्थितीचा सामना सहजरित्या करू शकतात. तो लोकांना योग्य सल्ला देऊन त्यांच्या समस्या देखील सोडवतात. असे लोक आपल्या नॉलेजच्या जोरावर प्रसिद्धी आणि लौकिक मिळवतात. 


5. पराक्रमी, धाडसी
जे लोक पराक्रमी अर्थात धाडसी असतात ते स्वतःच्या जोरावर प्रसिद्धी मिळवतात. विकट परिस्थितीतही धाडसी लोक घाबरत नाहीत. आपल्यासोबतच ते इतरांचीही मदत करतात. त्यांचे हेच गुण त्यांना लोकप्रीय बनवतात. 


6. कमी बोलणे
ज्यांना विचारपूर्वक कधी आणि काय बोलावे याची जाणीव असते ते लोक कमीच बोलतात. विचारपूर्वक आणि कमी बोलणारे लोक इतरांचे बोलणे योग्यरित्या ऐकूण घेण्यासाठी ओळखले जातात. या उलट ज्यांना कधी काय बोलावे हे सूचत नाही, त्यांना आदर सन्मान होत नाही.


7. क्षमतेनुसार दान
दान करणे सर्वांनाच आवश्यक आहे. हिंदू धर्मात ही गोष्ट बंधनकारक आहे. दान करून आपण कुणाचीही मदत करू शकता. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार दान करावे. अशा प्रकारचे लोक आयुष्यात यशस्वी आणि लोकप्रीय ठरतात.


8. इतरांनी केलेले उपकार नेहमी लक्षा ठेवणारे
आयुष्यात प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या मदतीची गरज आवश्य असते. अनेक प्रसंगी आपल्याला कुणी तरी कामी आलेच असेल. अशात बरेच लोक त्यांचे उपकार विसरून जातात. या उलट काही लोक असेही असतात जे इतरांनी केलेले उपकार आयुष्यभर विसरत नाहीत. आपल्या सुख-दुखात ते नेहमीच त्यांना स्मरणात ठेवतात. असेच लोक प्रसिद्ध होतात.

 

बातम्या आणखी आहेत...