आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शकुंतला देवी'बायोपिकसाठी विद्या आणि सान्याने सुरू केले वाचन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्या बालन आणि सान्या मल्होत्रा यांनी मानवी संगणक 'शकुंतला देवी' यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटातील विद्या बालनचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला होता. त्यानंतर, डॉटर डेला सान्याला या चित्रपटात घेतल्याची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमात ती शकुंतला देवीची मुलगी अनुपमा बॅनर्जीच्या भूमिकेत दिसणार आहे. ऑल वुमन टीम : या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अनू मेनन दिग्दर्शक असून नैनिका महतानी यांच्यासह त्यांनी पटकथा लिहिली आहे. त्याचबरोबर इशिता मोइत्रा ही या चित्रपटाची संवाद लेखक आहे. दिग्दर्शनापासून ते लेखन आणि मुख्य भूमिकेपर्यंत सर्व काही महिलाच सांभाळत आहेत, त्यामुळे महिलांच्या हाती कारभार असलेला हा पहिला चित्रपट असू शकतो.

बातम्या आणखी आहेत...