आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकनंतर विद्या बालनचे वडील हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विद्या बालनचे वडील पी.आर.बालन यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुत्रांनुसार पी.आर. बालन यांनी सोमवारी अचानक अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांना तात्काळ हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विद्याच्या स्पोकपर्सनने स्पष्ट केले की, सीनियर पी.आर. बालन यांची प्रकृती आता स्थिर आहे. 


दोन मुलींचे वडील आहेत पी.आर. बालन

- 2017 मध्ये एका मुलाखती दरम्यान पी.आर. बालन यांनी सांगितले होते की, त्यांना दोन मुली(विद्या आणि प्रिया) आहे. परंतू तरीही त्यांना मुलाची इच्छा नाही. ते सांगतात की, मुलासाठी लोकांनी मला खुप सांगितले. परंतू मी मुलासाठी कधीच प्रार्थना केली नाही. एवढेच नाही तर पी.आर बालन म्हणाले की, जेव्हा वयाच्या 55 व्या वर्षी मी जॉब सोडला होता, माझ्याकडे काही सेव्हिंग्सही नव्हते. तेव्हा माझी मुलगी विद्या माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली. याच मुलाखतीत विद्या म्हणाली होती की, माझ्या वडिलांनी मला स्वप्न पुर्ण करण्यापासून कधीच अडवले नाही. त्यांचे हे विचार खुप फायदेशीर ठरले, विद्या आज बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री आहे.

 

डिजीकेबलचे व्हाइस प्रेसिटेंड आहेत पी.आर. बालन 
- विद्या बालनचे वडील पी.आर. बालन डिजीकेबलचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत. ते रिलायन्स कम्युनिकेशनचा एक भाग आहेत. ही मुंबई बेस्ड केबल टेलीव्हिजन कंपनी आहे. यासोबतच ही कंपनी टेलीफोन, डाटा आणि इंटरनेस सर्विस प्रोव्हाइड करते. कंपनीचे नेटवर्क 14 राज्यांच्या 46 शहरांत पसरले आहे.

बातम्या आणखी आहेत...