आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : विद्या बालन आज आपला 40 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहेत. तिचा जन्म 1979 ला मुंबईत झाला. विद्या बालनने अनेक सुपरहिट फिल्ममध्ये काम केले आहे, मात्र तिने चित्रपटात येण्यासाठी खूप स्ट्रगलही केला आहे. तिने सर्वात आधी साउथच्या चित्रपटांत काम केले, पण ज्या कोणत्या चित्रपट तिला घेतले जायचे नंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला त्यामधून काढले जायचे. अशाप्रकारे विद्याला 12 चित्रपटनमधून काढले गेले. डायरेक्टर्स तिला अपशकुनी समजू लागले. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तिने 6 महिने ऑडिशन दिल्या. तेव्हा कुठे जाऊन तिला 'परिणीता' चित्रपट मिळाला.
बर्थडेच्या निमित्ताने तुम्हाला सांगत आहोत विद्याच्या आयुष्यातील काही किस्से...
एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' चे प्रसिद्ध गाणे 'एक दो तीन' याच्यावर डान्स करताना पहिले आणि तेव्हाच तिने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. साउथ इंडियन कुटुंबातील पालक आपल्या मुलांना संगीताची आणि नृत्याची तालीम जरूर देतात. अशात मग विद्यानेही डान्स आणि गाणे शिकले. मात्र तिच्या पालकांची इच्छा नव्हती की तिने अभनेत्री व्हावे.
पण विद्याने ऐकले नाही कॉलेजला गेल्यानंतर पाहिल्याचवर्षी विद्या अभिनय करू लागली. तिने 'हम पांच' आणि काही जाहिरातींमध्येही काम केले. एमए केल्यानंतर 21 वर्षाच्या विद्याला सुपरस्टार मोहन लालसोबत मलयालम फिल्ममध्ये पहिला ब्रेक मिळाला. पण मोहन लाल आणि डायरेक्टरमध्ये भांडण झाले आणि चित्रपट थांबला.
आईने केली होती मुलींसाठी प्रार्थना..
विद्याला त्यानंतर जवळपास एक डजन मलयालम चित्रपटातून बाहेर काढले गेले, ज्यासाठी तिला साइन केले गेले होते. ती मुकेशसोबत एक मलयालम फिल्म करत होती, पण तीसुद्धा मधेच बंद झाली. तेव्हा विद्या बालनसुद्धा स्वतःला बनशीबी समजू लागली होती. मग तिला एक तामिळ फिल्मसाठी साइन केले गेले, तिला भीती होती यातूनही तिला बाहेर काढले जाईल आणि तसेच झाले, तिच्या जागी दुसऱ्या हीरोइन घेतले गेलं. मग तिची आई जिला विद्याने हीरोइन बानू नये असे वाटायचे, ती आता विदयासाठी प्रार्थना करू लागली कि निदान एक चित्रपट तरी तिने पूर्ण करावा.
विद्याला प्रदीप सरकारने आपला नवीन अल्बम यूफोरियासाठी साइन केले. विद्याने काम केले आणि इथूनच तिचे नशीब चमकले. सरकार म्हणाले की तिच्यासोबत एक चित्रपट नक्की करतील.
दिलेल्या शब्दानुसार सरकारने तिला फिल्म 'परिणिता' ऑफर केली. विद्याने त्यात इतका सुंदर अभिनय केला की नंतर तिने कधीच मागे वालुम पहिले नाही.
डिसऑर्डरने त्रस्त आहे विद्या...
विद्याला साफ सफाई खूप आवडते. तिला ऑब्सेसिव कंपलसिव डिसऑर्डर आहे. तिला जराशीही धूळ दिसली तर ती लगेच साफसफाई करू लागते. एवढेच नाही तर घरात कुणाचे चप्पल घालून फिरणेही तिला सहन होत नाही.
या चित्रपटात केले काम...
विद्याने 'लगे रहो मुन्ना भाई', 'गुरु', 'सलाम-ए-इशक', 'हे बेबी', 'हल्ला बोल', 'किस्मत कनेक्शन', 'पा', 'द डर्टी पिक्चर', 'घनचक्कर', 'बॉबी जासूस', 'बेगम जान' अशा अनेक चित्रपट काम केले आहे. तिचा अपकमिंग चित्रपट 'मिशन मंगल' आहे, ज्याची शूटिंग अजून सुरु आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.