आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vidya Balan Starts Shooting For Her First Short Film 'Natkhat', Putting Her First Step As A Producer.

विद्या बालनने आपल्या पहिल्या शॉर्ट फिल्म 'नटखट' चे शूटिंग केले सुरु, निर्माती म्हणून टाकत आहे पहिले पाऊल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विद्या बालन इंडस्ट्रीतील सर्वात टॅलेंटेड अभिनेत्रींनपैकी एक आहे. लवकरच ती 'मिशन मंगल' मध्ये दिसणार आहे. 'कहानी', 'डर्टी पिक्चर', 'पा' आणि 'तुम्हारी सुलु' यांसारखे दर्जेदार चित्रपट केल्यानंतर ती आता आपल्या करिअरची पहिली शॉर्ट फिल्म 'नटखट' करणार आहे. अभिनेत्रीने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच ती प्रोड्यूसर म्हणूनदेखील पुढे येत आहे. 

 

इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो... 
विद्याने फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'मला सांगताना खूप आनंद होत आहे की, मी एक अभिनेत्री म्हणून आपल्या पहिल्या शॉर्ट फिल्मचे शूटिंग सुरु केले आहे. याचे नाव 'नटखट' आहे आणि अभिनयासोबतच मी या लघुपटाची निर्मितीदेखील करत आहे. माझ्याकडे कधी निर्माती बनण्याचा काही प्लॅन नव्हता पण कथा लिहिली होती. पण मला कथा आवडली आणि मी रॉनी स्क्रूवालासोबत याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.' 

 

सामाजिक मुद्द्यांवर बोलणार आहे 'नटखट'
चित्रपटाची कहाणी अनुकंपा हर्ष आणि शान व्यासने लिहिली आहे, यामध्ये समाजातील पितृसत्ताक व्यवस्था, लैंगिक असमानता, बलात्कार, घरेलू हिंसाचार, पुरुषांचे एकाचवेळी अनेक महिलांशी असलेले संबंध अशा अनेक मुद्यांवर प्रकाश टाकणार आहे. सोबतच आई वडील आणि संगोपण याबद्दल चांगला संदेश देणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...