आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिशन मंगल' च्या यशामुळे माझा स्वतःवरचा विश्वास वृद्धिंगत झाला', विद्या बालन चित्रपट आणि आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चित्रपट 'तुम्हारी सुलू' च्या दोन वर्षानंतर विद्या बालनने 'मिशन मंगल' सोबत जोरदार कमबॅक केला आहे. हा चित्रपट रिलीजच्या 19 व्या दिवशीच 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की, चित्रपटात तिने साकारलेली तारा शिंदेची भूमिका अक्षय कुमारच्या भूमिकेपेक्षा काही कमी नाही. चित्रपटातचे यश आणि पुढच्या इच्छांबद्दल ती मोकळेपणाने बोलली. 
 
 

या भूमिकेबद्दल विशेष कौतुक मिळाले ?
तारा शिंदेमध्ये लोकांना कुठूनही विद्या बालन दिसली नाही. महिला या भूमिकेने इंस्पायर झाल्या. त्यांना तारा शिंदे पॉवरफुल आणि सहज दोन्ही वाटली.  चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे माझा स्वतःवरचा विश्वास आणखीनच वाढला. 
 
 

इंडियन रूल बुकव्यतिरिक्त जुगाडूदेखील असतात. तुम्ही काही जुगाड केला ?
जुगाड तर चालूच राहातो. अभिनय करणे म्हणजे एका जुगाडासारखेच आहे. कलाकारांना इमोशनसोबत खेळावे लागते. भले त्याने ते इमोशन जगलेले असो किंवा नसो ? इमोशन मॅनिप्युलेट करतात. जेणेकरून सीननुसार कलाकार ते एक्सप्रेस करू शकतील. 
 
 

तू 'भूल भुलैया' चे कॅरेक्टर मंजुलिकाचे इमोशन फीलच केले नव्हते ?
योग्य बोललात. खऱ्या आयुष्यात घर आणि वर्क प्लेसमध्येदेखील माणसाला जुगाडू व्हावे लागते. मंजुलिकाची भूमिकादेखील खूप चॅलेंजिंग होती. 
 
 

त्यावर स्पिन ऑफ बनवू इच्छितेस का ?
मला वाटते की, मंजुलिकाची बँक स्टोरी 'भूल भुलैया' मध्ये दाखवली गेली होती. त्यावर स्पिन ऑफ तर नाही बानू शकत. हो, 'कहानी' मध्ये जे माझे विद्या बागचीचे कॅरेक्टर आहे, त्यावर नक्कीच स्पिन ऑफ बनेल. ते यासाठी कारण चित्रपटात तिच्या रिव्हेंजचीच स्टोरी दाखवली होती. तीन वर्षे तिने खोट्या ओळखीवर आयुष्य जगले. तसे काही एक वेगळ्या धाटणीची व्यक्तीच करू शकते. अशात, विद्या बागचीची स्ट्रॉन्ग वुमन बनण्याची भूतकाळातील कहाणी अजूनच इंटरेस्टिंग असू शकते. 
 
 

अक्षय कुमार तर मॉर्निंग पर्सन आहे. तू आणि तुझया घरात काय परिस्थिती आहे ?
अक्षयला तर मी अनेक वर्षांपासून ओळखते. तो 13 - 14 वर्षांपासून मॉर्निंग पर्सन आहे. माझ्या अवतीभोवतीही मॉर्निंग पर्सन राहतात. माझे पती सिद्धार्थला लवकर उठण्याची सवय आहे. माझे आई वडीलही लवकर उठणाऱ्यांपैकी आहे. मी रात्रीची राणी आहे. 
 
 

जर अभिनेत्री नसती तर काय बनली असतीस ?
सायकॅट्रिस्ट असते. ते यासाठी की, मला लोकांना समजून घेणे आवडते. 
 
 
इस्रोचे संशोधक मर्यादित संसाधनांमध्ये खूप काही करतात. नासामध्येदेखील जास्तीत जास्त इंजीनिअर इंडियन आहेत.
 
 
बॅन व्यतिरिक्त इंसेन्सिटिव्ह उत्तम केले पाहिजे. तेव्हाच त्यांना वाटेल की, भारतात राहूनच त्यांचे भले होऊ शकते. बॅन किंवा फोर्स यूज करण्यावर दुसरा जुगाड शोधू लागले. अशात असे वातावरण तयार केले पाहिजे, ज्यामध्ये इंजीनिअरिंग किंवा बाकी प्रोफेशनल्सला वाटेल की, देशात राहूनही त्यांचे भले होऊ शकते. सोबतच ते देशाचेही भले करू शकतात. देशातही चांगल्या संधींची कमी नाही. 

बातम्या आणखी आहेत...