आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थोडं गोड... थोडं तिखट 

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

 विद्या निकम

पनीर पुलाव

 • साहित्य : २ कप बासमती तांदूळ, पाव किलो पनीर, एक कप मटारदाणे, आलं, हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार, तळलेले बेदाणे- काजू पाव वाटी, मीठ, साखर चवीनुसार, २ चमचे लिंबाचा रस, ४ लवंगा, २ तुकडे दालचिनी,३ लहान वेलदोडे, २ तमालपत्रं, ३ चमचे चांगलं तूप.
 • कृती : तेल गरम करून पनीरचे तुकडे करून ते तळून घ्या. उरलेल्या तेलात गरम मसाले, मटार, आलं, मिरच्या, धुतलेले तांदूळ घालून परता. पाच मिनिटांनी तांदळाच्या दुप्पट पाणी, मीठ, साखर, लिंबाचा रस घाला. भात झाल्यावर तो गरम असतानाच त्यात पनीर, बेदाणे, काजू घालून थोडा वेळ झाकून ठेवा.

व्हेज कटलेट 

 • साहित्य : प्रत्येकी १ वाटी ब्रेडक्रम्स, वाफवलेला मटार, गाजराचा कीस, २ उकड़ून कुस्करलेले बटाटे, १ चमचा आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर,बारीक रवा, तेल
 • कृती : सर्व भाज्या, ब्रेडक्रम्स, आलं-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर एकत्र करून मळून घ्या. छोटे छोटे गोळे करून त्याला तळहातावर थापटून टिक्कीचा आकार द्या. ताटलीमध्ये रवा घेऊन त्यावर ही टिक्की घोळवून घ्या. पॅनमध्ये तेल टाकून ही टिक्की शॅलो फ्राय करून घ्या. टोमॅटो सॉससोबत खायला द्या.

पनीर बेसन पराठा

 • साहित्य : १ वाटी कणीक, तिखट, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर, १ वाटी बेसन, ५० ग्रॅम पनीर, १ वाटी टोमॅटो सॉस, १ वाटी आमचूर पावडर, तेल, हळद,पाणी, १ बारीक चिरलेला कांदा
 • कृती : बेसनात आमचूर पावडर, हळद, तिखट, मीठ, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घट्ट भिजवा. त्याची पोळी लाटून घ्या. तव्यावर एका बाजूने पूर्ण आणि दुसऱ्या बाजूने थोडीशीच शेकून घ्या. त्यावर टोमॅटो सॉस पसरवा. नंतर त्यावर पनीर किसून टाका. तेल टाकून शेकून घ्या. हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.

दुधी भोपळ्याच्या पुऱ्या

 • साहित्य : अर्धा किलो दुधी भोपळा, १ चमचा तीळ, १ चमचा ओवा, २ चमचे गरम तेल, १ चमचा तिखट, चिमूटभर हिंग, १ चमचा जिरेपूड, अर्धा कप बेसन, कणीक, मीठ आवश्यकतेनुसार.
 • कृती : दुधी भोपळा न सोलता किसून वाफवा. त्यात तीळ, ओवा, तेलाचं मोहन, हिंगपावडर, जिरेपूड, डाळीचे पीठ आणि आवश्यकेतनुसार मीठ, कणीक घालून भिजवा. नेहमीच्या पद्धतीनं पुऱ्या लाटून त्या तळून घ्या. सॉस अथवा चटणीसोबत सर्व्ह करा.

रसगुल्ले

 • साहित्य: १ कप गाईच्या दुधाचं मऊ पनीर, १ चमचा रवा, १ चमचा मैदा, खडीसाखरेचे तुकडे, ४ कप साखर, ६ कप पाणी, गुलाबजल, बेकिंग पावडर.
 • कृती : पनीर, रवा, मैदा, चिमूटभर बेकिंग पावडर घालून मिक्सर मधून काढा. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्यात १-१ खडीसाखरेचा तुकडा ठेवा. पाक तयार करा. त्यात बनवलेले गोळे सोडून ते २० मिनिटं उकळू द्या. पाकात अधूनमधून गार पाणी घाला. पाक कमी असला तर रसगुल्ले फुगत नाहीत त्यामुळे पाकात रसगुल्ले उकळवताना अंदाज घेऊन पाकात पाणी टाकावे.
बातम्या आणखी आहेत...