आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचे सॅनिटेरी पॅड्स का वापरत आहे व्हिएतनामचे सैनिक? येथे जाणून घ्या Shocking Reason

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - महिलांचे सॅनिटेरी पॅड वापरणारे व्हिएतनामचे सैनिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, युद्धात किंवा प्रशिक्षणात हे सैनिक सॅनिटेरी पॅड का वापरत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चीनच्या यू शुआन फॅन ग्रुपने यासंदर्भातील काही फोटो आपल्या फेसबूक पेजवर शेअर केले आहेत. तसेच केवळ व्हिएतनामचे सैनिकच नव्हे, तर चीनचे आणि इतर काही आशियाई देशांचे सैनिक सुद्धा प्रशिक्षण, मोहिमा आणि युद्धांत सॅनिटेरी पॅड वापरत असल्याचा खुलासा केला. सोबतच, त्याचे कारण सुद्धा लिहिले आहे. 


हे आहे कारण...
फेसबूकवर शेअर करण्यात आलेल्या काही फोटोंमध्ये व्हिएतनामचे सैनिक आपल्या बूटांमध्ये सॅनिटेरी पॅड लावताना दिसून येतात. ते आपल्या बूटांमध्ये या पॅडचा कुशन म्हणून वापर करत आहेत. सैनिकांना अनेकवेळा 24 तासांपेक्षा अधिक वेळ बूट बदलता किंवा काढता येत नाही. अशात बूटांसोबत महागडे सॉक्स सुद्धा कुचकामी ठरतात. सॅनिटेरी पॅड बूटांमध्ये घालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, हे बूटांमध्ये पायांना येणारा घाम शोषूण घेतात. तसेच दुर्गंध सुद्धा येत नाही. एवढेच नव्हे, तर जास्त वेळ एकच सॉक्स घातल्यास बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनचा धोका असतो. परंतु, सॅनिटेरी पॅड घातल्याने बॅक्टेरिया आणि त्यापूसन होणाऱ्या संक्रमणाचा धोका सुद्धा कमी होतो. नेक्स्टशार्क डॉटकॉमच्या वृत्तानुसार, अशा प्रकारे सॅनिटेरी पॅडचा वापर चीनचे सैनिक सुद्धा करतात. तर इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, चीनच्या एका विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी सॅनिटेरी पॅड्सला रीपॅकेज केले होते. जेणेकरून तरुणांना ते खरेदी करताना संकोच वाटणार नाही. चीनचे महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा आपल्या बूटांमध्ये सॅनिटेरी पॅड वापरतात.

बातम्या आणखी आहेत...