आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकताची मालिका 'हैवान'ला प्रेक्षकांची नापसंती, टीआरपी घसरल्यामुळे होणार बंद..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : जवळपास ६ महिन्यांपूर्वी सुरू झालेली एकता कपूरची मालिका 'हैवान' लवकरच बंद होणार आहे. मालिकेशी संबंधित लोक सांगतात की, निर्मात्यांनी खूप अपेक्षांसह ही प्रदर्शित केली होती. एकताने प्रथमच गुन्हेगारी आणि विज्ञानावर आधारित विषयावर मालिका सुरू केली, परंतु प्रेक्षकांना ही संकल्पना आवडली नाही. सतत टीआरपी घसरत चालल्यामुळे चॅनलने या मालिकेला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या माहितीची खात्री पटवण्यासाठी आम्ही मालिकेतील मुख्य कलाकार परम सिंहला बोललो. यावर तो म्हणाला, ही मालिका लवकरच बंद होणार, असे मला वाटत होते. मात्र आताच जास्त बोलणे योग्य नाही. पण खरचं ही मालिका बंद होणार असल्याचे ऐकले आहे. आता मी फक्त एवढेच सांगू शकतो की, ही मालिका माझ्यासाठी खूप वेगळी होती.

भावनिक आणि कठीण अनुभव देणारी होती. या मालिकेचे सात महिने चित्रीकरण केले आणि हा अनुभव खूपच चांगला होता. या मालिकेसाठी आणि निमार्त्यासोबत मला वेळ घालवायला मिळाला, म्हणून मी समाधानी आणि आनंदी आहे.
 

बातम्या आणखी आहेत...