कोलार पिंपरीत वाघाची / कोलार पिंपरीत वाघाची दहशत: विभागाने दिला नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nov 07,2018 11:57:00 AM IST

वणी - वणी परिसरात सध्या वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दि. ५ नोव्हेंबरला वेकोलीच्या कोलार पिंपरी परिसरात वाघ दिसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राळेगाव परिसरात वाघाने १३ जणांचा बळी घेतल्यावर वन विभागाने नरभक्षक वाघिणीचा शोध घेऊन तिला ठार केले. यानंतर वणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर दिसत आहे.


शिरपूर येथे एका शेतात वाघ दिसल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली होती तर नीवली येथे वाघाने गाईची शिकार केली होती. त्यामुळे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. वणीच्या सभोवताल वेकोलीच्या कोळसा खाणी आहे. प्रदूषणावर मात करण्यासाठी वेकोलीने खान परिसरात ऑस्ट्रीलियन बाबूळची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने परिसराला जंगलाचे स्वरूप आले आहे.

या परिसरात दोन वाघाचा वावर आहे. दि. ५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजताचे सुमारास कोलार पिंपरी वेकोली वसाहती जवळ वाघाने दर्शन घडले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच वेकोली कामगारांना रात्री बेरात्री कामावर जावे लागते त्यामुळे कामगार कामावर कर्तव्यावर जातांना जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे. या परिसरात दोन वाघाचा वावर असल्याची पुष्टी वन विभागाने केली असून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

X