आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DIGच्या मारहाणीचा व्हिडिओ: अॅक्सिडेंटनंतर वर्दीचा धाक दाखवणे पडले महागात, लोकांनी बेदम मारून केले रक्तबंबाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - अॅक्सिडेंटनंतर वर्दीचा धाक दाखवणे एका डीआयजींना महागात पडले. जमावाने लाथा-बुक्क्यांनी त्यांना रक्तबंबाळ करून सोडले. हेमंत कुमार कल्सन हरियाणामध्ये व्हिजिलेंस ब्यूरोमध्ये पोस्टेड आहेत. घटना 23 सप्टेंबर रोजी पिंजौर(पंचकूला) मध्ये घडली. परंतु याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तथापि, या घटनेबद्दल पोलिसांत कोणतीही FIR दाखल करण्यात आलेली नाही.

 

- पंचकुलाच्या सेक्टर-17 येथील व्हिजिलन्स स्टेशनमध्ये पोस्टेड हेमंत आपल्या भावाच्या घरून परतत होते. गाडीत त्यांच्यासोबत मित्र राजेश वशिष्ठही होते. यादरम्यान त्यांच्या गाडीने एका स्कॉर्पियोला धडक मारली होती. तथापि, डीआयजी वेगळीच माहिती देतात. त्यांच्या मते, स्कॉर्पियो ड्रायव्हरने त्यांना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केले. यानंतर त्यांनी स्कार्पियोचा पाठलाग केला आणि पोलिस गाडी (पीसीआर) बोलावून त्या ड्रायव्हरवर कडक कारवाई करण्यास सांगितले.


- डीआयजींनी स्कॉर्पियोच्या ड्रायव्हरला तीन-चार चापटा मारल्याचे स्वीकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यादरम्यानच दारूच्या दुकानाजवळ उभा असलेला जमाव अचानक त्यांच्यावर तुटून पडला. त्यांनी आपल्या जखमांसाठी मेडिकल करून घेतले. परंतु रिपोर्ट नॉर्मल निघाली होती, म्हणूनच कोणतीही FIR दाखल झाली नाही. डीआयजी म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये आता समझौता झालेला आहे.

 

- दुसरीकडे, असे सांगितले जात आहे की, घटनेच्या वेळी डीआयजी दारू प्यायलेले होते. ते सारखा वर्दीचा धाक दाखवत होते. यामुळेच लोकांचा राग अनावर झाला. पब्लिकने त्यांना एवढे मारले की, त्यांच्या नाकातोंडातून रक्त निघू लागले. व्हायरल व्हिडिओमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी डीआयजी स्वत:चा परिचय देताना दिसत आहेत. ते हात जोडून माफीही मागताना दिसले. 

 

बातम्या आणखी आहेत...