आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाेंगराची काळी मैना अदृश्य होते आहे..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाता गळा, शिंपता मळा आणि लिहिता हातावळा हे कविवर्य बा. भ. बाेरकर यांचे सुवचन पुढे नेऊन आस्वादता रसना असे म्हणता येईल. स्वर, कर प्रतिभा त्याचप्रमाणे रुचकर पदार्थांचा आस्वाद घेण्याची रसिकता या वृत्ती मनुष्याच्या ठायी असल्याच पाहिजेत. आपल्याकडे ऋतुमानाप्रमाणे विविध फळांची रेलचेल असते. जळगावची मेहरुणची केळी व बाेरे, डहाणू व घोलवडचे चिकू, पुण्याचे अंजीर, सीताफळे व विदर्भाची संत्री सुप्रसिद्ध आहेत. क जीवनसत्त्व असणारी काळी करवंदे उन्हाळ्यात येतात. डाेंगरदऱ्यातील आदिवासी बांधव काट्याकुट्यातून ही फळे खुडून आणतात. या वेळी मात्र वैशाख महिना अर्धा उलटला तरी डोंगरची ही मैना दृष्टीस पडत नाही. या साध्या आनंदाला आपण मुकलो आहोत.
- विजय भदाणे, ई-मेलद्वारे
बातम्या आणखी आहेत...