आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील पंतप्रधानपद निश्चितपणे मराठी माणसाकडेच, शरद पवार किंवा गडकरी असू शकतील: विजय दर्डा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय दर्डा हे १९९८ ते २०१६ पर्यंत राज्यसभेचे खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन आहेत. देशातील सध्याचे राजकीय चित्र आणि शक्यतांवर दैनिक भास्करच्या धर्मेंद्रसिंह भदौरिया यांनी त्यांच्याशी विशेष संवाद साधला. त्याचे अंश... 

 

प्रश्न : मोदींना महाआघाडीच हरवू शकते? वा मोदींना हरवणे कठीण आहे? 
उत्तर : आज महाआघाडी स्थापण्यात खूप अडचणी आहेत. ती काळानुसार जोम धरत असते. मध्य प्रदेश आणि राजस्थानात काय झाले, त्यावरून कल ठरवू नका. यूपी व महाराष्ट्र हेच देशाचे चित्र पालटवतील. मायावतींना मुलायमसिंहांची अडचण होती. ते एकमेकांचे कट्टर विरोधक होते. मात्र ही अडचण अखिलेश यांना नाही. यामुळे आघाडी होईलच. छोट्या पक्षांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्यांच्या पूर्ततेत एनडीए अपयशी ठरली. मोदीजी आल्यानंतर भाजप त्यांच्या मागे गेला. भाजपला सांभाळणारा संघही त्यांच्यामागे गेला. संघाचा एक गट मोदींत सामावून गेला आहे. तथापि, इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनीही पराभवाची चव चाखली होती. यामुळे निवडणुकांत जय-पराजय सर्व शक्य आहे. 
प्रश्न : भाजपकडे काेणते मुद्दे अाहेत? 
उत्तर: सरकार येवो-जावो, लोकशाही जिवंत असली पाहिजे. प्रथमच मतदान करणाऱ्या नव्या पिढीचा विश्वासघात झाला आहे. तरुणांना सकारात्मकतेऐवजी नकारात्मकतेची जास्त चिंता आहे. लोकशाहीत सत्ता येते अन् जातेही. हा क्रम सुरू राहिला पाहिजे. वाहते पाणीच निर्मळ असते. सांगण्यासाठी भाजप म्हणेलच की, विकास केला, मेक इन इंडिया केले, जगभरात प्रतिष्ठा उंचावली. मात्र खरेच तसे झाले आहे का? मग ते राम मंदिर, हिंदू-मुस्लिम वाद आणतील, ध्रुवीकरणही करतील. 
प्रश्न : आगामी निवडणुकीत मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसकडे मुद्दे कोणते? 
उत्तर : काँग्रेसकडे खूप मुद्दे आहेत. महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ, रफालचा घोळ, शेतकरी, बेरोजगारी व जातीयवादाचाही मुद्दा आहेच. काश्मिरात यापूर्वी कधीच एवढी वाईट स्थिती नव्हती. काँग्रेस हे मुद्दे किती प्रभावीपणे मांडू शकेल, हे महत्त्वाचे ठरेल. राहुल गांधी खूप प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना सत्तेची घाई नाही ही खूप चांगली गोष्ट आहे. 
प्रश्न : चेहराच नसलेले विरोधक मोदींचा सामना करू शकतील? 
उत्तर : चेहऱ्यापेक्षा मुद्दा काय आहे, हा मुख्य प्रश्न आहे. चेहऱ्याची गरज नाही. आमच्यापुढे अनेक चेहरे आहेत. हा काळ प्रादेशिक पक्षांचा आहे. काँग्रेसने वा भाजपने स्वबळावर सरकार स्थापण्याचे दिवस संपलेत. मला खात्री आहे की पुढील पंतप्रधान, जो कुणी असेल ताे मराठीच असेल. 
प्रश्न : निवडणुकीत मोदी सरकारला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्षांच्या वतीने पंतप्रधानपदासाठी सर्वात सक्षम कोण असेल आणि का? 
उत्तर : राहुल गांधी आणि शरद पवार या दोनच व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येतात. राहुल गांधी यांना घाई नाही. त्यांना सत्तेची लालसा नाही. सर्वांनी मिळून ठरवले तर गोष्ट निराळी. राहुल यांनी नकार दिला तर शरद पवार आहेत. मी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे जी दोन मराठी माणसे आहेत तीच पंतप्रधान होतील. भाजपच्या जागा कमी आल्या तर नितीन गडकरींचे नाव समोर येईल. 
विजय दर्डा चेअरमन, लोकमत ग्रुप ऑफ न्यूजपेपर्स 

बातम्या आणखी आहेत...