Home | International | Other Country | Vijay Mallya arrives at The Oval cricket ground to watch India vs Australia world cup match

WorldCup/ फरार विजय माल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी पोहचला ओव्हलमध्ये, म्हणाला- 'खेळ पाहण्यासाठी आलोय...'

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 09, 2019, 04:56 PM IST

माल्या मागील वर्षी सप्टेंबरमध्ये भारत-इंग्लंड टेस्ट सामन्या दरम्यानही आला होता

  • Vijay Mallya arrives at The Oval cricket ground to watch India vs Australia world cup match

    स्पोर्ट डेस्क- फरार मद्य व्यवसायिक विजय माल्या आज(9जून)ला भारत-ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील सामना पाहण्यासाठी इंग्लडच्या ओव्हल मैदानात आला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाला-"मी सामना पाहण्यासाठी आलो आहे." माल्या यापूर्वीही सप्टेंबर 2018 मध्ये भारत-इंग्लंडमध्ये झालेला टेस्ट सामना पाहण्यासाठी आला होता. तेव्हा काही भारतीय समर्थकांनी "चोर...चोर..." अशा घोषणा दिल्या होत्या.


    माल्याला इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमला भेटायचे होते, पण तेव्हा इंग्लड सरकारने याची परवानगी दिली नाही. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यानही माल्या भारतचा सामना पाहण्यासाठी गेला होता, त्यावेळी त्याला हुटींगचा सामना करावा लागला होता.


    माल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज
    आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मध्ये माल्या रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर टीमचा मालक होता. आता त्याचा मुलगा सिद्धार्थ माल्या सध्या त्या टीमचा मालक आहे. माल्याविरूद्ध फ्रॉड, मनी लॉन्ड्रिंग, फेमाचे उल्लंघन, असे आरोप आहेत. माल्यावर भारतीय बँकांचे 9,000 कोटींचे कर्ज आहे. त्याच्या किंगफिशर एअरलाइंसने बँकांकडून कर्ज घेतले होते. माल्या 2016 मध्ये लंडनला पळून गेला होता. मुंबईच्या विशेष न्यायालयाने(पीएमएलए) त्याला "आतंराष्ट्रीय भगोडा(फरार)" घोषित केले होते. ईडीने त्याची देश आणि परदेशातील सर्व संपत्ती जप्त केली आहे, तसेच लडंनच्या वेस्टमिन्सटर कोर्टात त्याच्या आत्मसमर्पणाचा खटला सुरू आहे.

Trending