आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9000 कोटींच्या बदल्यात 13000 कोटींची संपत्ती जप्त, हा कोणता न्याय आहे? हे कधीपर्यंत चालेल: विजय माल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आर्थिक घोटाळ्या प्रकरणी फरार मद्य व्यापारी विजय माल्याने  शुक्रवारी एक ट्विट केले. त्यात तो म्हणाला की, त्याच्या ग्रुपची 13,000 कोटींची संपत्ती जप्त केली आहे, पण बँकांचा दावा फक्त 9,000 कोटी रूपयांचा आहे. त्याने ट्विट केले की, रोज सकाळी मी झोपतून उठतो तेव्हा मला कळते की, कर्ज वसुली करणाऱ्यांनी माझी अजून एक संपत्ती जप्त केली आहे. न्याय कुठला न्याय आहे, हे थांबणार आहे का नाही? 


जनतेचे पैसे कोर्टात वाया घालवत आहेत बँका
माल्याचा म्हणने आहे की, भारतीय बँकांनी इंग्लंडमध्ये माझ्याविरूद्ध केस दाखल करण्याचे लायसेंस दिले आहे. जनतेच्या पैशांना कोर्टातील केसवर वाया घालवत आहेत.


भारतात हा दावा केला जातो की, मी 9,000 कोटी रूपये घेऊन पळालो ज्याने सरकारी बँकांना नुकसान झाले. पण हे बरोबर नाहीये.

Every morning I wake up to yet another attachment by the DRT recovery officer. Value already crossed 13,000 crores. Banks claim dues including all interest of 9,000 crores which is subject to review. How far will this go and well beyond ? Justified ??

— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 1, 2019


लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्टात डिसेंबरमध्ये विजय माल्याच्या प्रत्यार्पणाची मंजुरी मागितली होती, तेथील सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. माल्याला प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरूद्ध कोर्टात अपील करण्याचा आधिकार असेल.


माल्यावर भारतीय बँकांचे 9000 कोटी रूपयांचे कर्ज आहे. मार्च 2016 मध्ये तो लंडनला पळून गेला होता. मागच्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्याला भगोडा आर्थिक गुन्हे नियमाअंतर्गत देशातील पहिला भगोडा घोषित केले होते.

 

बातम्या आणखी आहेत...