आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100% कर्जाची परतफेड करणार विजय माल्ल्या; बँकांना केली विनंती, Please माझी ऑफर स्वीकारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारतात बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय माल्ल्याने सर्वच बँकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याने आपल्यावर असलेला संपूर्ण कर्ज अर्थातच 100 टक्के परतफेड करणार असल्याची ऑफर दिली आहे. त्याने यासंदर्भात अनेक प्रकारचे ट्वीट केले. माध्यमांमध्ये ओरडून सांगितले जात आहे, की विजय माल्ल्या सर्वसामान्य लोकांचे हजारो कोटी घेऊन पसार झाला, तो कर्जबुडवा आहे. परंतु, कर्नाटक हायकोर्टात मी सेटलमेंट करण्याचा प्रस्तावही दिला होता त्यावर कुणी काहीच बोलत नाहीत असेही त्याने लिहिले आहे.

 

Airlines struggling financially partly becoz of high ATF prices. Kingfisher was a fab airline that faced the highest ever crude prices of $ 140/barrel. Losses mounted and that’s where Banks money went.I have offered to repay 100 % of the Principal amount to them. Please take it.

— Vijay Mallya (@TheVijayMallya) December 5, 2018

 

कुठे खर्च झाली बँकांची रक्कम?
विजय माल्ल्याने आपल्या बुडीत निघालेली एअरलाइंस कंपनी किंगफिशरवर सुद्धा आपले मत मांडले. तो म्हणाला, ''एटीफ वाढल्याने एअरलाइंसला उतरती कळा लागली होती. यानंतर किंगफिशरला वाढीव इंधन दरांचा फटका बसला. त्यावेळी आर्थिक संकटात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 140 डॉलर झाली. त्याचा सर्वात वाइट परिणाम किंगफिशर एअरलाइंसवर झाला. बँकांकडून घेतलेला संपूर्ण कर्ज त्यामध्येच खर्च झाला. तरीही आपण 100 टक्के मूळ कर्जाची रक्कम परत करण्यास तयार आहोत. "कृपया, बँकांनी माझी ऑफर स्वीकार करावी." अशी विनंती माल्ल्याने केली आहे.

 

 

बुडालेली एअरलाइंस कंपनी किंगफिशरचा मालक आणि माजी मद्य सम्राट असलेला विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये राहतो. 2016 मध्ये त्याने देश सोडला. त्याच्या डोक्यावर विविद बँकांकडून दिलेले 9000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज आहे. गेल्या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात भारताने त्याच्या विरोधात कर्जबुडवेगिरी आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लावून अधिकृतरित्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय अधिकारी ब्रिटनच्या कोर्टात त्याला भारतात आणण्यासाठी लढा देत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...