आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्ट टाइम जाॅब अाणि अार्थिक मदतीमधून गाठला साेनेेरी यशाचा पल्ला; गतवेळचा उपविजेता विजय राऊत ठरला \'मि.एशिया 2019\'चा चॅम्पियन 90 किलो वजन गटात सुवर्णासह पटकावली ओव्हरआॅल चॅम्पियनशिप 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अंत्यत हलाखीच्या परिस्थितीमध्ये प्रचंड मेनहत करून शरीरसौष्ठवपटू (बाॅडी बिल्डर) विजय राऊतने नुकताच दिल्ली येथे "ओव्हरआॅल चॅम्पियनशिप मि. एशिया २०१९'चे विजेतेपद पटकावले. यादरम्यान त्याने झालेल्या स्पर्धेत ९० किलो वजन गटात सर्व तुल्यबळ स्पर्धकांना मागे टाकून सुवर्णपदक पटकावले. 

 

घरच्या साधारण परिस्थितीवर मात करून अमरावतीचा शरीरसौष्ठवपटू विजय राऊतने जागतिक व आशियाई स्पर्धेतही भरभरून यश मिळवत या क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. बाॅडी बिल्डिंगमध्ये विजय सध्या सातत्याने सर्वच स्तरांवर यश मिळवत असून मागील काही वर्षांपासून स्थानिक स्तरावरील 'आझाद श्री' किताब त्याने सोडलाच नाही. 

फिटनेस एक्स्प्रेस जिममध्ये प्रशिक्षक सुशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात त्याने मागील ८ वर्षांपासून शरीर कमावण्यास सुरुवात केली. अथक परिश्रम घेत त्याने पिळदार शरीर घडवले. यातूनच मग त्याने विदर्भासह राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. दिल्ली येथे झालेल्या मि. एशिया स्पर्धेत आशिया खंडातील १२ देशांचे दिग्गज शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. त्यांना मागे टाकून विजयने यंदा यश संपादन केले. २०१८ मध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली तरी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, याचे शल्यही त्याला बोचत होते. २०१९ मध्ये आपण किताब मिळवायचाच या इराद्याने झपाटलेल्या विजयने आणखी परिश्रम घेतले. याचे फळही त्याला मिळाले. विजयने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे जिल्हा बाॅडीबिल्डिंग संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. 

 

घरचा बुक बाइंडिंगचा व्यवसाय सांभाळून मिळवले यश 
विजयच्या घरची परिस्थिती अगदी साधारण, वडील बुक बाइंडिंगचा व्यवसाय करतात. तुटपुंज्या कमाईतही त्याने शरीरसौष्ठवाची आवड जपली. यासाठी दररोज किमान ५०० ते १००० रु. खर्च करावे लागतात. तरी कधी पेपर वाटून, कधी स्वत: काम करून तर कधी जिल्हाधिकारी कार्यालयातून मदत मिळवून विजयने शरीरसौष्ठवात जागतिक, राष्ट्रीय, राज्य आणि विदर्भ स्तरावर यश मिळवले आहे. 

 

आजवरची कामगिरी 
 फिलेेफेनिया जागतिक स्पर्धेत कांस्य 
दोन वेळा मिस्टर इंडिया किताब 
तीन वेळा महाराष्ट्र श्री किताब 
दहा वेळा विदर्भ श्री किताब 
२०१८ मध्ये मि. आशिया स्पर्धेत राैप्य 
 २०१९ मध्ये मि. आशिया स्पर्धेत ९० किलो गटात सुवर्ण, "ओव्हरआॅल चॅम्पियनशिप' 

 

बातम्या आणखी आहेत...