आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याच्या जागी विजय शंकर, तर केएल राहुलची जागा घेणार शुभमन गिल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या विरोधात वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी ऑलराउंडर विजय शंकर आणि फलंदाज शुभमन गिल यांना टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दोघांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांची जागा घेतली आहे. हार्दिक आणि राहुल यांनी करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या शोमध्ये वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बीसीसीआयने दोघांनाही निलंबित केले. नवीन खेळाडूंपैकी विजय ऑस्ट्रेलियात वनडे मालिकेत टीम इंडियाशी जोडला जाणार आहे. तर शुभमन न्यूझीलंड मालिकेत भारतीय संघात खेळणार आहे.


राहुलच्या जागी झाली होती मयंकची निवड
निवड समितीने दिलेल्या माहितीनुसार, "यापूर्वी मयंक अग्रवालला केएल राहुलच्या जागी आणि विजयला हार्दिक पंड्याच्या जागी निवडण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, मयंक अनफिट असल्याने त्याला वगळून शुभमनला संधी देण्यात आली आहे." टीम व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एक खेळाडू मागितला होता. त्यामुळे, विजयला आधी पाठवले जात आहे. तर शुभमनला रणजी ट्रॉफी आणि इंडिया ए टीममध्ये चांगल्या प्रदर्शनासाठी हा मान मिळाला आहे असेही समितीने स्पष्ट केले. विजयने भारतासाठी आतापर्यंत 5 टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 17 धावा काढल्या आणि 3 विकेट्स सुद्धा पटकावल्या. तर शुभमनने 36 लिस्ट ए सामने खेळले आहेत. यात त्याने 47.78 च्या सरासरीसह 1529 धावा काढल्या आहेत. त्याच्या नावे चार शतक आणि सात अर्धशतक आहेत.

बातम्या आणखी आहेत...