Home | Maharashtra | Mumbai | Vijay Starrer Sarkar Broke The Record Of Baahubali 2

'सरकार' चित्रपटावर राजकारणी करत आहेत टिका, पण प्रेक्षकांच्या पसंतीनंतर 2 दिवसात कमावेल 100 कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 03:00 PM IST

'बाहुबली 2' आणि 'संजू'पेक्षाही हिट असलेल्या या चित्रपटाच्या मेकर्सला राजकारण्यांसमोर झुकावे लागले

 • Vijay Starrer Sarkar Broke The Record Of Baahubali 2

  मुंबई. 'सरकार' हा विजय स्टारर तामिळ चित्रपट बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. मंगळवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत 'बाहुबली 2'च्या तामिळ बॉक्सऑफिसवर ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे 'बाहुबली 2' ने तामिळ बॉक्सऑफिसवर 19 कोटींची कमाई केली होती. तर 'सरकार' चित्रपटाने 30 कोटींचे कलेक्शन केले आहे. जर संपुर्ण इंडियन बॉक्सऑफिसविषयी बोलायचे झाले तर सरकारने ओपनिंग डेला 47 कोटी 85 लाखांचे कलेक्शन केले आहे. ही कमाई यावर्षी रिलीज झालेल्या बॉलिवूडच्या हायएस्ट ओपनर चित्रपट 'संजू'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे. संजूने ओपनिंग डेला 34 कोटी 75 लाखांची कमाई केली होती.


  दोन दिवसात वर्ल्डवाइड 100 कोटींपेक्षा जास्त कमावले
  - वर्ल्डवाइड जवळपास 3000 स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाने तामिळ बॉक्सऑफिसवर दूस-या दिवशी 24 कोटींची कमाई केली. तर जगभरात याचे कलेक्शन 110 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ट्रेड एक्सपर्ट्सनुसार वीकेंडपर्यंत हा चित्रपट 200 कोटींचा आकडा ओलांडेल. 'सरकार'चे डायरेक्टर ए. आर. गुरुगडॉस आहेत. हा चित्रपट 6 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये विजयसोबतच किर्ती सुरेश, वरलक्ष्मी, सरतकुमार, प्रेम कुमार, योगी बाबू आणि राधा देवी प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

  वादांमध्ये अडकला आहे 'सरकार'
  - राजकीय प्लॉटवर आधारित असल्यामुळे या चित्रपटाला राजकारण्याच्या विरोधाचा सामना करावा लागतोय. चित्रपटात एका सीनमध्ये तामिळनाडूच्या माजी चीफ मिनिस्टर दिवंगत जयललिता यांचा उल्लेख आहे. यासोबतच काही इतर सीन्स वादग्रस्त असल्याचे बोलले जातेय. जयललिला यांच्या AIADMK पार्टीच्या नेत्यांनी जयललिता यांचा अपमान झाल्याचा आरोप लावला आहे आणि डायलॉग हटवण्यासाठी आंदोलनही केले. तामिळनाडूचे कायदा मंत्री सीव्ही षनमुगम यांनी गुरुवारी चित्रपटावर सडकून टिका केली. षनमुगम म्हणतात की, हा चित्रपट लोकांना हिंसा करण्यासाठी प्रेरित करतो. जनतेने निवडलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जातो. अखेर, फिल्म मेकर्स सीन्स हटवण्यासाठी आणि जयललिता यांचे नाव म्यूट करण्यासाठी तयार झाले आहेत. असे स्पष्टीकरण सेन्सॉरबोर्डाने दिले.

  रजनीकांत यांनी नेत्यांना सुनावले
  तामिळ आणि तेलुगु चित्रपटाचे सुपरस्टार रजनीकांत यांनी AIADMK च्या नेत्यांना सुनावले आहे. रजनीकांत यांनी तामिळमध्ये ट्वीट करत लिहिले की, "सेन्सॉर बोर्डाकडून पास झालेल्या चित्रपटातून सीन्स काढणे, बॅनरला नुकसान पोहोचवणे आणि स्क्रीनिंग अडवण्यासाठी आंदोलन करणे हे कायद्याच्या विरुध्द आहे. मी याचा निषेध करतो."

Trending