Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | vijaya rahatkar reappointed as the chairperson of the state womens commission

विजया रहाटकर पुन्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  

प्रतिनिधी | Update - Feb 22, 2019, 11:51 AM IST

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली आहे.

  • vijaya rahatkar reappointed as the chairperson of the state womens commission

    औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

    ‘माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल मी राज्य सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानते. गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे. खूप काही करण्याचा प्रयत्न केला आहे. तीच रेघ पुढे ओढून पुढील तीन वर्षांमध्येही आयोगाचे काम सर्वस्पर्शी, सर्वांगीण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन,’ अशी प्रतिक्रिया रहाटकर यांनी दिली.

Trending