दसरा / विजयादशमीला या कारणामुळे लुटले जाते सोने आणि केले जाते सीमोल्लंघन

पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत

रिलिजन डेस्क

Oct 08,2019 12:15:00 AM IST


नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. सोने लुटण्याचा. दस-याच्या दिवशी लोक एकत्र येतात. आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, दसर्‍याला आपटा व शमीच्या पानांना का विशेष महत्त्व आहे...


रघुराजाच्या काळची पुराण कथा आहे, वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स. चौदा विद्यामंध्ये त्याने प्रावीण्य संपादन केले. गुरूऋणातून उतराई होण्यासाठी त्याने गुरुदक्षिणेबद्दल विचारले. विद्या लोकांच्या कल्याणासाठीच उपयोगात आण हीच माझी गुरू दक्षिणा, असे गुरूने सांगितले. मात्र शिष्याने जास्तच आग्रह केला. तेव्हा गुरूंनी सांगितले की, चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे. गुरूंना वाटले कौत्स आता गुरूदक्षिणेचा नाद सोडून देईल.


कौत्स रघुराजाच्या दरबारी गेला. त्यास सगळी परिस्थिती निवेदन केली. राजाकडेही एवढे द्रव्य नव्हते म्हणून त्याने कुबेरावर स्वारी करून द्रव्य मिळवण्याचा बेत केला. रघुराजाच्या स्वारीची कुणकुण लागताच कुबेराने नगरीच्या वेशीबाहेर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. या सुवर्ण मुद्रा ज्या झाडा वर पडल्या ते झाड आपट्याचे होते. त्या घेऊन जा म्हणून कौत्साला सांगितले. १४ कोटींपेक्षा एकही जादा सुवणमुद्रा त्याने घेतली नाही. दिलेले दान कुबेरही कसा परत घेणार. शेवटी त्या सुवर्णमुद्रा नगरजनांनी लुटून न्याव्यात असा सुवर्णमध्य काढण्यात आला. तो दिवस होता विजयादशमीचा. म्हणून सीमोल्लंघन करून सोने लुटून नेले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला.


कौत्स रघुराजाच्या दरबारी गेला. त्यास सगळी परिस्थिती निवेदन केली. राजाकडेही एवढे द्रव्य नव्हते म्हणून त्याने कुबेरावर स्वारी करून द्रव्य मिळवण्याचा बेत केला. रघुराजाच्या स्वारीची कुणकुण लागताच कुबेराने नगरीच्या वेशीबाहेर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. या सुवर्ण मुद्रा ज्या झाडा वर पडल्या ते झाड आपट्याचे होते. त्या घेऊन जा म्हणून कौत्साला सांगितले. १४ कोटींपेक्षा एकही जादा सुवणमुद्रा त्याने घेतली नाही. दिलेले दान कुबेरही कसा परत घेणार. शेवटी त्या सुवर्णमुद्रा नगरजनांनी लुटून न्याव्यात असा सुवर्णमध्य काढण्यात आला. तो दिवस होता विजयादशमीचा. म्हणून सीमोल्लंघन करून सोने लुटून नेले जाते.


पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तो विजयादशमीचा दिवस होता.

X
COMMENT