आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढातून विजयसिंह मोहिते पाटील यांनीच लढावे.. भाजपने नाईक-निंबाळकरांचा केला पत्ता कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने संजय शिंदे यांच्या रुपात तगडा उमेदवार दिल्यानंतर भाजपनेही तोडीस तोड उमेदवार देण्याची रणनिती आखली आहे. शिंदे यांना शह द्यायचा असेल तर रणजितसिंह मोहिते पाटील किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर या नवख्या उमेदवारपेक्षा विद्ममान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारखाच उमेदवार हवा, या निर्णयाप्रत भाजप पोहोचली आहे. यासाठी भाजपने रणजितसिंह मोहिते यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाही अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्याच्या सूचना दिल्याने समजते.

 

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या गळाला सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर लागले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र, संजयशिंदे यांच्यासमोर दोन्ही रणजितसिंह टिकणार नाहीत, याची चर्चा माढा मतदारसंघात सुरू झाली. त्यानंतर भाजपने आणखी काय डावपेच आखता येतील याची चाचपणी सुरू केली आहे.

 

भाजपसमोर हे दोन्ही रणजित व सुभाष देशमुख यांच्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. माढ्यात धनगर समाजाचे प्राबल्य असले तरी संजय शिंदे यांना टक्कर देण्यासाठी मराठा आणि तो ही तगडा हवा याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाली आहे. त्याचमुळे त्यांनी विद्यमान खासदार व अद्याप भाजपमध्ये प्रवेश केला नसलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनाच गळ घालण्यात आली आहे. त्यावर विचार करू, अशी भूमिका विजयदादांनी घेतल्याचे कळते.

 

एकूण माढ्यात यावेळी मराठा विरुद्ध मराठा अशी लढत होणार आहे. धनगर व मराठा बहुल मतदारसंघ असून दुष्काळी टापू म्हणूनही ओळखला जातो. या गोंधळात राष्ट्रवादीकडून यापूर्वी चर्चेत ठेवलेले निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे.


रोहन स्पर्धेत
भाजपकडुन सहकार मंत्री सुभाष देशमुख माढ्यासाठी इच्छुक होते. मात्र शरद पवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर देशमुख यांचे नाव मागे पडले. त्यानंतर देशमुख यांनी आपला मुलगा रोहन यासाठी फिल्डींग लावली. सध्या दोन रणजितसिंह मध्ये रोहनही भाजपकडून माढ्यामधून स्पर्धेत असल्याचे समजते.