Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Vijaysingh Pandit Facebook Post on Loksabha Election 2019

ज्यांना विझताना वाचवले त्याच दिव्यांनी चटके दिले, बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीनंतर विजयसिंह पंडित यांची फेसबुक पोस्ट

प्रतिनिधी | Update - Mar 16, 2019, 11:07 AM IST

आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.

  • Vijaysingh Pandit Facebook Post on Loksabha Election 2019

    बीड- बीड लोकसभेसाठी शुक्रवारी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरवले. उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा गट मात्र यामुळे नाराज झाला.

    एकीकडे पंडित समर्थक सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत असताना अमरसिंह यांचे छोटे बंधू तथा माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनीही फेसबुक पेजवरून 'आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.' अशी पोस्ट टाकून हे कटुसत्य असल्याचे लिहिलेे. यामुळे ऐनवेळी तिकीट कापण्यात कुणी सूत्रे हलवली व विजयसिंह यांचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरू झाली.

Trending