आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सांगोला- माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीबद्दल एक ते दोन दिवसात सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मत राष्ट्रवादी कॉँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगोला येथे शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. रफालबाबत ‘दाल में कुछ काला है’ असे म्हणत जेपीसीची मागणी करून केंद्र सरकारने दूध का दूध पाणी का पाणी हे जनतेसमोर आणण्याची संधी असल्याचे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील जागावाटपाबाबत पवार म्हणाले, ४४ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. उर्वरीत चार जागांबाबत चर्चा चालू आहे. दोन्ही पक्षांच्या राज्य प्रमुखांवर ही जबाबदारी सोपवली आहे. यावर अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष येत्या ८ दिवसात निर्णय घेईल. वंचित बहुजन आघाडी लोकसभेसाठी सर्वत्र उमेदवार देत सुटले आहे, त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा चालू असल्याचे पवारांनी सांगून राज ठाकरेंबरोबर कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, ज्या पक्षांचे ज्या राज्यात प्राबल्य आहे त्या पक्ष प्रमुखाबद्दल बरोबर इतर सहकारी पक्षांनी जागा वाटपाबाबत चर्चा करण्याचे ठरले आहे. निवडणूक निकालानंतरच दिल्लीत सर्व पक्षांची एकजूट बाबत चर्चा होईल. आगामी लोकसभेसाठी मोदीऐवजी गडकरींचे नाव पुढे केले जात आहे, यावर पवार म्हणाले गडकरी माझे विधिमंडळातील मित्र आहेत. त्यांचे नाव पुढे केल्याने मला त्यांची काळजी वाटते असे पवार मिश्किलपणे म्हणाले.
पवार म्हणाले राफेल वरुन पार्लमेंटमध्ये जेपीसीची मागणी केली जात आहे त्याला हे सरकार ना ना करत आहे, म्हणजेच दाल में कुछ काला आहे. पूर्वीच्या सरकारने बोफर्स प्रश्नी जेपीसीची मागणी केली होती ही विरोधकांची मागणी त्या सरकारने मान्य करून जेपीसी नेमले होते. त्या प्रमाणेच या केंद्र सरकारने राफेल बाबत जेपीसीची नेमणूक करून जनतेसमोर सत्य समोर आणावे.
‘माढा लोकसभा मतदार संघात आपणच उभे राहावे, अशी मागणी पक्षातून केली जात आहे याबद्दल पवार म्हणाले, मला खासदार विजयसिंह मोहिते, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उभारण्याची विनंती केली आहे. यावर मी सहकाऱ्यांची चर्चा करून एक दोन दिवसांतच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. पण मला या लोकसभा मतदारसंघात उभारु नये म्हणून भाजपचे काही मंत्री सांगत आहेत, याचा मला आनंद वाटत आहे. कारण या मतदारसंघात जास्त गावे आहेत माझ्या प्रकृतीच्या मानाने मला फिरता येईल का नाही, याची त्यांना चिंता वाटते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.