आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vikram Bhatt Shocking Transformation Unrecognizable: Ex Miss Universe Sushmita Sen Boyfriend Vikrant Tried To Commit Suicide

हॉरर चित्रपटांच्या दिग्दर्शकापासून ते BIG BOSSच्या एक्स कंटेस्टेंटपर्यंत... LOOKS मध्ये झाला जबरदस्त बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट सध्या त्यांच्या मेकओव्हरमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुर्वीचा आणि आताचा असे दोन फोटोज शेअर केले आहेत, यामध्ये विक्रम यांना ओळखणे कठीण झाले आहे. त्यांनी दाढी-मिशा आणि केस काळे करुन घेतले आहेत. सोबतच त्यांनी बरेच वजन कमी केले आहे, त्यामुळे त्यांच्या चेह-यातही बराच बदल झालेला दिसून येतोय. वयाच्या 49 व्या वर्षी केलेल्या या ट्रान्सफॉर्मेशनमुळे विक्रम तरुण दिसत आहेत. 

 

जेव्हा आत्महत्या करणार होते विक्रम भट...

- विक्रम यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ते आत्महत्या करणार होते, असा खुलासा केला. त्याकाळात सुश्मिता सेनसोबत त्यांचे अफेअर सुरु होते.
- विक्रम यांनी सांगितल्यानुसार, "सुष्मिता सेनसोबत माझे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे माझा घटस्फोट झाला होता. मी अतिशय डिप्रेस्ड झालो होतो. जणू संपूर्ण आयुष्यच संपून गेल्याचे मला वाटत होते."
- मला आठवतंय, "बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर उभे राहून मी तेथून उडी घेण्याचा विचार केला होता. येथून उडी घेतल्यानंतर काय होईल? असा विचार माझ्या मनात आला होता. मग वाटले यामुळे माझ्या सगळ्या अडचणी दूर होणार नाहीत. हा सुसाइडच्या अतिशय जवळ पोहोचण्याचा क्षण होता." 
- विक्रमचे लग्न आदितीसोबत झाले होते. 2011 मध्ये हे दाम्पत्य विभक्त झाले. या दोघांना एक मुलगी असून कृष्णा तिचे नाव आहे. 

 

सुष्मितासोबत अफेअर असताना 27 वर्षांचे होते विक्रम भट... 
- विक्रम यांनी मुलाखतीत सांगितल्यानुसार, ज्याकाळात सुश्मितासोबत त्यांचे अफेअर होते, तेव्हा ती 20 वर्षांची तर ते 27 वर्षांचे होते.
- ब्रेकअपनंतर कधीही सुश्मिताला भेटले नसल्याचे त्यांनी सांगितले. याचे कारण म्हणजे कधीही दोघांनी एकमेकांकडे परतण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. दीर्घ काळ विक्रम भट यांचे अफेअर अमिषा पटेलसोबतही होते.
- विक्रमने सांगितले होते, की सुश्मिता किंवा अमिषापैकी कुणाशीही त्यांची लग्न करण्याची इच्छा नव्हती. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आलेल्या 'बिग बॉस'च्या एक्स कंटेस्टंट्सविषयी... 

बातम्या आणखी आहेत...