आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हॉरर नव्हे, विनोदी होता हा चित्रपट’ स्त्री’बाबत बोलले विक्रम...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हॉरर चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात जास्त कमाई कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘स्त्री’बाबत हॉररपटांचे जाणकार विक्रम भट्ट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘मी अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही. तो रिलीज झाला होता तेव्हा मी आपल्या चित्रपटाची शूटिंग करत होतो. तथापि, या चित्रपटाबाबत थोडेफार जरुर ऐकले आहे. त्यावरून असे म्हणता येईल की, तो हॉरर नव्हे तर हॉरर-कॉमेडी चित्रपट होता. भितीपेक्षा लोकांना हसूच जास्त आले असेल. भितीचा डोसही विनोदाच्या पुडीत बांधून देण्याची प्रथा यामुळे सुरू झाली आहे. यामध्ये काहीच वाइट नाही. असो, मी आतापर्यंत शुद्ध हॉरर चित्रपटच बनवत आलो आहे.’ ‘स्त्री’नंतरपासून बॉलीवुडमध्ये हॉरर-कॉमेडी पठडीतील आणखीही चित्रपटांची निर्मिती होत आहे. हे चित्रपट मोठे बॅनर प्रस्थापित कलावंतांसोबत बनवता आहेत. यासंदर्भात विक्रम म्हणतात, ‘पूर्वी असे नव्हते. संपूर्ण जगात हॉररपट नेहमीच नवीन चेहऱ्यांना घेऊन बनवले जात.  आम्हीदेखील हेच करत आलो. ‘राज’च्या वेळी बिपाशा बासू आणि डीनो मोरिया नवीन चेहरे होते. त्यापुढील फ्रँचायझीतही नवीन चेहऱ्यांसोबतच आम्ही काम केले होते. मला वाटते की, इतर प्रकारांप्रमाणेच हॉररपटांमध्येही २०० ते ३०० कोटी क्लबमध्ये समाविष्ट होण्याची पूर्ण क्षमता आहे.’

बातम्या आणखी आहेत...