आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chandrayaan 2 Lander Vikram Latest Update: ISRO Says Chandrayaan Lander Vikram Not Broken

चंद्रावर सुस्थितीत कलंडलेल्या अवस्थेत आढळले लँडर विक्रम : इस्रो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - चांद्रयान-२ चे लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकून तिरके पडले होते. इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, विक्रमची मोडतोड झालेली नाही, ते पूर्णपणे सुस्थितीत आहे. संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सात सप्टेंबरला लँडिंगच्या वेळी २.१ किलोमीटर उंचीवर असताना विक्रमशी संपर्क तुटला होता. ऑर्बिटरने त्याचे फोटो इस्रोकडे पाठवले आहेत. चांद्रयान-२ मोहिमेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, लँडर चंद्रावर सुस्थितीत आहे. ते तिरके झाले आहे. विक्रम नियोजित लँडिंग स्थळाच्या अगदी जवळच पडले आहे.

नागपूर पोलिसांचे टि्वट
नागपूर पोलिसांनी टि्वटरवर विक्रमसाठी एक मेसेज पाठवला आहे. त्यात पोलिसांनी म्हटले की, प्रिय विक्रम, कृपया उत्तर द्या. सिग्नल तोडल्याबद्दल आम्ही तुमचे चालान कापणार नाही.

1 संपर्काची शक्यता कमीच : शास्त्रज्ञांचे मत : इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण त्यासाठी लँडरच्या प्रणाली कार्यरत असणे आवश्यक आहे. सॉफ्ट लँडिंगनंतर समजा सर्व प्रणाली कार्यरत असतील तर संपर्क शक्य होऊ शकतो. ती शक्यता कमी दिसते.

2 अँटिनाची स्थिती बदलणे सर्वात कठीण काम : इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विक्रमशी संपर्काच्या आशा अद्याप जिवंत आहेत. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. मात्र, तेथे त्याला हलवता येणार नाही. सर्वात म्हत्त्वाचे काम अँटिनाच्या स्थितीचे आहे. त्याला ग्राउंड स्टेशन किंवा ऑर्बिटरच्या दिशेने वळवावे लागेल. ही प्रक्रिया कठीण असते.

3 इंजिनमध्ये बिघाड असेल तर आशा सोडावी लागेल : इस्रोतील निवृत्त शास्त्रज्ञाने सांगितले की, मुख्य इंजिनात बिघाडाची शक्यता आहे. विक्रमचे इंजिन सुरू झाले नसेल. असे असेल तर संपर्क साधणे शक्य होणार नाही.
संग्रहित छायाचित्र

4 छायाचित्रानुसार विक्रम सुस्थितीत असे म्हणणे योग्य नाही : चांद्रयान -२ शी संबंधित एका शास्त्रज्ञाने सांगितले, १४७१ किलोचे विक्रम दोन किमी उंचीवरून पडले आहे. दूरवरून घेतलेल्या छायाचित्रावरून ते सुस्थितीत आहे असे म्हणणे योग्य नाही.

पाकिस्तानच्या पहिल्या महिला अंतराळवीराने केले अभिनंदन
पाकच्या पहिल्या महिला अंतराळवीर नामिरा सलीम यांनी चांद्रयान-२ साठी इस्रोचे अभिनंदन केले आहे. नामिरा म्हणाल्या, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगच्या एेतिहासिक कामगिरीसाठी मी भारत आणि इस्रोचे अभिनंदन करते.

बातम्या आणखी आहेत...