आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vikram Lander Did Hard Landing On Moon, Darkness At South Pole So Lander Could Not Be Found : NASA

विक्रम लँडरची चंद्रावर हार्ड लँडिंग, दक्षिण ध्रुवावरील अंधारामुळे ऑर्बिटरला त्याचे स्थान सापडले नाही : नासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क  - अमेरिकी अंतराळ संस्था नासाने शुक्रवारी चांद्रयान-2 बाबत आपला अहवाल सादर केला. विक्रम लँडरची हार्ड लँडिंग झाल्याचे यात सांगण्यात आले. विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होते तेथील काही फोटोज नासाने जारी केले आहेत. पण विक्रम लँडर कुठे पडले याबाबत काहीच समजू शकले नाही. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रावर सध्या रात्र असल्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावार फक्त सावल्या दिसत आहेत. अशात विक्रम लँडर एखाद्या सावलीआड गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 

            ऑक्टोबरमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील अंधार मिटल्यानंतर नासा पुन्हा एकदा आपल्या लुनार रिकॉनेसा ऑर्बिटरच्या कॅमेराच्या मदतीने विक्रमच्या ठिकाण जाणण्याचा आणि त्याचे फोटो घेण्याचा प्रयत्न करेल. याअगोदरही नासाने अशाप्रकारचे अनेक प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले.       

विक्रमची लँडिंग व्यवस्थित नाही, पण ते सुरक्षित
 
याअगोदर इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगतिले की, विक्रम लँडरची व्यवस्थित लँडिंग झाली नाही. पण ते सुरक्षित आहे. इस्रोने 21 सप्टेंबरपर्यंत लँडरसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र झाली. 
 
 
 

लँडर न सापडल्यांनतर नासाने इस्रोला दिले होते धैर्य
 
याअगोदर नासाने चांद्रयान-2 बाबत ट्वीट केले होते. त्यात लिहिले होते, 'अंतराळ हे कठीण आहे. इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-2 उतरवण्याचा केलेल्या प्रयत्नाचे आम्ही कौतूक करतो. तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात आपण सूर्यमालेतील शोध घेण्यासाठी एकत्रित काम करू'