आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमसिंघे- राजपाक्षेंच्या खासदारांत हाणामारी: श्रीलंकेच्या संसदेत प्रचंड गदारोळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो -  श्रीलंकेत राजकीय संकट आणखी गंभीर झाले असतानाच गुरुवारी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. त्यादरम्यान हाणामारीही झाली. पंतप्रधान महिंदा राजपाक्षे यांनी गुरुवारी संसदेत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करताच हा गदारोळ सुरू झाला. त्यावर पदावरून हटवण्यात आलेले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या यूएनपी या पक्षाने मत विभागणी करण्याची विनंती केली.

 

ती सभापती कारू जयसूर्या यांनी मान्य केली. त्यामुळे राजपाक्षे यांचे समर्थक संसद सदस्य संतप्त झाले आणि ते सभापतींच्या समोर आले. सभापतींच्या बचावासाठी विक्रमसिंघे यांचे समर्थक संसद सदस्य पुढे आले. त्यादरम्यान दोन्ही बाजूंच्या खासदारांत शाब्दिक चकमक उडाली काहींनी पाण्याच्या बाटल्या, कागद आणि इतर साहित्य सभापतींच्या दिशेने फेकले. या हाणामारीत काही संसद सदस्यांना जखमाही झाल्या. राजपाक्षे यांचे समर्थक संसद सदस्य सभापतींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ट्विट यूएनपीचे नेते हर्ष डी सिल्व्हा यांनी सभागृहातूनच केले.  

 

सभागृहात अशी सुरू झाली तुंबळ हाणामारी 
सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती जयसूर्या यांनी राजपाक्षेंना बाजू मांडण्यास परवानगी दिली. त्यावर ते म्हणाले, मी राष्ट्राध्यक्ष होतो, त्यामुळे माझ्यासाठी पंतप्रधान हे पद महत्त्वाचे नाही. निवडणूक घेण्याच्या माझ्या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी विनंती २२५ सदस्यांना करत आहे. त्यावर यूएनपीचे संसद सदस्य लक्ष्मण किरिएला मतदानाद्वारे निर्णय करावा, अशी मागणी केली. सभापतींनी ती मंजूर केली. त्यानंतर दोन्ही बाजूंचे सदस्य सभापतींच्या आसनासमोर आले.

 

बातम्या आणखी आहेत...