आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vikrant Massey Can Marry Model Sheetal Thakur In The Year 2020, Has Secretly Engaged

2020 मध्ये विक्रांत मैसी शीतल ठाकूर या मॉडेलशी करु शकतो लग्न, गुपचुप उरकला होता साखरपुडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः आपल्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या अभिनेता विक्रांत मैसीने लग्नाविषयी खुलासा केला आहे. स्पॉटबॉय या इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, 2020 मध्ये तो शीतल ठाकूरसोबत लग्न करू शकतो. विक्रांत 'मिर्जापूर', क्रिमिनल जस्टिस यासारख्या हिट वेब सीरिजमध्ये दिसला आहे.
वेबसाइटनुसार, विक्रांतने सांगितले की यावर्षी दोघे कधीही लग्न करू शकतात. विशेष म्हणजे हे दोघे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते, पण माध्यमांसमोर ते उघडपणे समोर आले नाहीत. विक्रांत आणि शीतल आपल्या इन्स्टाग्राम हँडल्सवर क्यूट फोटो शेअर करत असतात. काही आठवड्यांपूर्वी दोघांनी गुपचुप साखरपुडा केला होता. 

एका एंटरटेन्मेंट वेबसाइटशी झालेल्या संभाषणात त्याने साखरपुड्याच्या बातमीची पुष्टी केली. विक्रांतने सांगितल्यानुसार, त्याने गेल्या महिन्यात शीतलसोबत रोका सेरेमनीत गुपचुप साखरपुडा केला. याविषयी तो म्हणतो, "मला वाटते की त्याविषयी योग्य वेळी बोलले पाहिजे. परंतु हो आमचे खूप छोटेसे खासगी फंक्शन होते." सेरेमनीत काही निकटचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सामील होते.

शीतल ठाकूर व्यवसायाने एक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. 2017 मध्ये ती 'बृज मोहन अमर रहे' मध्ये दिसली आहे. सध्या ती विनय पाठक यांच्यासमवेत पुनीत प्रकाश दिग्दर्शित ‘दिलफायर’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. तर तिचा पार्टनर विक्रांत मैसीचे 'गिन्नी वेड्स सनी', 'हसीन दिलरुबा' हे दोन चित्रपट यावर्षी रिलीज होऊ शकतात. दीपिका पदुकोणसोबतचा त्याचा 'छपक' हा चित्रपट 10 जानेवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.