आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS-IPS बनण्याची क्रेझ आहे या गावातील युवकांमध्ये, कोणी डॉक्टर तर कोणी इस्रोत सायंटिस्ट, घरांच्या बाहेर दिसतात लाल दिव्यांच्या गाड्या...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जौनपुर- उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात माधोपट्टी नावाचे गाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे गाव खुप खास आहे कारण या गावाला आयएएस-आयपीएस आधिकाऱ्यांचे गाव म्हणले जाते. या गावात 75 कुटुंब आहेत आणि त्यात 47 आयएएस आधिकारी आहेत आणि ते यूपी आणि दुसऱ्या राज्यात सेवा देत आहेत. जाणून घ्या या गावातील काही खास बाबी...

1914 मध्ये गावाला मिळाला पहिला आधीकारी

- मीडिया रिपोर्ट्सनुसार, साल 1914 मध्ये पहिल्यांता गावातील युवक मुस्तफा हुसैन (शायर वामिक़ जौनपुरी यांचे वडील) पीसीएसमध्ये निवडले गेले होते. त्यानंतर 1952 मध्ये इंदू प्रकाश सिंह यांचे आयएएसच्या 13व्या रँकवर सलेक्शन झाले होते.

- इंदू प्रकाश यांच्या नंतर गावातील युवकांमध्ये आयएएस-पीसीएससाठी चढोओढ सुरू झाली. इंदू प्रकाश फ्रांस सहित अनेक देशात भारताचे राजदूत राहिले आहेत.

- त्यानंतर गावातील चार सख्या भावांनी आयएएस बनून रेकॉर्ड बनवला होता. साल 1955 मध्ये एग्झाम पास करणारे विनय सिंह नंतर बिहारचे मुख्य सचिव बनले. तर 1964 मध्ये सख्ये भाऊ छत्रपाल सिंह आणि अजय सिंह सोबतच आयएएस बनले.


हुसैन यांच्या कमिश्नर बनल्यानंर वाढली क्रेझ 

- माधोपट्टीचे डॉ. सजल सिंह सांगतात की, ब्रिटिश सरकारमध्ये हुसैन यांच्या कमिश्नर बनल्यानंर गावातील युवक वर्ग प्रेरित झाला आणि आयएएस-आयपीएस बनण्याची क्रेझ वाढली.

- हे गाव डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरपासून 11 किलोमीटर दूर आहे. या गावाच्या बाहेर एक मोठे एंट्रेंस गेट आहे. या गावातील लोकसंख्या अंदाजे 800 आहे, आणि या गावात रोजच लाल दिव्यांच्या गाड्या पाहायला मिळतात.


महिलापण  नाहीत कमी.

- या गावातील महिला पुरूषांपेक्षा कमी नाहीत. आशा सिंह 1980 मध्ये, ऊषा सिंह 1982 मध्ये, कुवंर चंद्रमौल सिंह 1983 मध्ये आणि त्यांची पत्नी इंदू सिंह 1983 मध्ये, अमिताभ 1994 मध्ये आयपीएस बनले तर त्यांची पत्नी सरिता सिंहदेखील आयपीएस झाल्या.

- गावातील सजल सिंह यांचे म्हणने आहे की, आमच्या गावातील एजुकेशन लेव्हल खुप चांगला आहे. प्रत्येक घरात ग्रॅजुएट युवक आहेत. गावाचा अॅव्हरेज लिटरसी रेट 95% आहे, तर पूर्ण यूपीचा अॅव्हरेज लिटरसी रेट 69.72% आहे.


लेखकापासून सायंटिस्टपर्यंत

- येथील अमित पांडेय फक्त 22 वर्षांचे आहेत पण त्यांनी लिहीलेली अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गावातील अन्मजेय सिंह विश्व बँकेत नोकरीला आहेत.

- डॉक्टर नीरू सिंह आणि लालेन्द्र प्रताप सिंह वैज्ञानिक म्हणून भाभा इंस्टीट्यूटमध्ये तर ज्ञानू मिश्रा राष्ट्रीय आंतराळ संस्था इस्रोमध्ये कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...