आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदरामध्ये बाळ लपवून पळत होती महिला, गावकऱ्यांनी पाहिले तर दिली अशी शिक्षा, सोडण्यासाठी विनवण्या करत राहिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समस्तीपूर - बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्याच्या मुफस्सिल परिसरात एका महिलेला लोकांनी खुलेआम बेदम मारल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कोरबद्धा गावात एका महिलेला बाळ चोरल्याच्या आरोपात मारहाण करण्यात आली आहे. घटनेबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला गर्दीतून सोडवले. पोलिसांनी गावकऱ्यांनी संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून पोलिस सध्या चौकशी करत आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओदेखिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला चार वर्षांच्या एका मुलाला घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर चिडलेल्या गावकऱ्यांनी महिलेला मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 


गावकऱ्यांच्या मते, चार वर्षांचा आयुष कुमार घराबाहेर खेळत होता. महिला दाराजवळ पोहोचली आणि मुलाला साडीत गुंडाळून घेऊन जाऊ लागली. पण अनोळखी महिलेने उचलल्याने हा मुलगा जोरात रडू लागला. मुलाचा आवाज ऐकूण नातेवाईक आले. आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्यांनी महिलेला प्रचंड मारहाण केली. महिलेला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेले. महिलेचे चौकशी केली जाणार आहे. तसेच 

 

बातम्या आणखी आहेत...