आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशासाठी जवानाने दिले बलिदान, गावातील तरुणांनी पैसे गोळा करुन झोपडीत राहणाऱ्या शहीदाच्या पत्नीला बांधून दिले नवे घर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर(मध्यप्रदेश)- काल (गुरुवार) संपूर्ण देशात 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी मध्य प्रदेशातील बेटमा गावातील तरुणांनी हा स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानाच्या पत्नीला तरुणांनी नवे घर बांधून दिल्या आहेत. घर बांधण्यासाठी तरुणांनी लोकांकडून पैसे गोळा करून 11 लाखांची रक्कम जमा केली होती. सीमा सुरक्षा दलाचे जवान मोहन सिंग 27 वर्षांपुर्वी आसाममध्ये शहीद झाले होते. तेव्हापासून त्यांची पत्नी आणि इतर कुटुंब एका जुन्या झोपडीत राहत होती.

मोहन सिंग शहीद झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचे हाल झाले होते. त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणीदेखील उभ्या राहिल्या होत्या. डोक्यावर छत नसल्याने कुटुंबाला झोपडीत राहण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. सरकारकडून त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. या कठीण परिस्थित गावातील तरुणांनी घर बांधून देण्याचे ठरवले.

तरुणांनी "वन चेक-वन साइन" या नावाने एक मोहिम सुरू करत आर्थिक मदत उभारण्यास सुरुवात केली. घर बांधण्यासाठी 11 लाख रुपये जमा केल्याची माहिती मोहिमेत सहभागी विशाल राठी याने दिली आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नव्या घराची चावी त्यांच्या हवाली केली आहे. त्यांनी आम्हाला राखीदेखील बांधील. लवकरच कुटुंब नव्या घरात शिफ्ट होईल असेही त्याने सांगितले.