आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: झाडांमध्ये गतीमंद महिलेवर करत होते रेप, गावकऱ्यांनी रंगेहात पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - उत्तर प्रदेशच्या एका गावातील झाडा-झुडूपांमध्ये एका गतीमंद महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. 7 ऑगस्ट रोजी टिपण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये ग्रामस्थ 2 आरोपी मुलांची धुलाई करताना दिसून येत आहेत. गावकऱ्यांनी त्यांना मारहाण करताना व्हिडिओ देखील बनवला. आरोपींपैकी एकाने गावकऱ्यांना चकवा दिला आणि घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पुन्हा त्या आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आरोपींना ग्रामस्थांना असा दिला चकवा...
गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, गावातच झाडांमध्ये एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ते ऐकूण गावातील इतर लोकांना घटनास्थळी बोलावले. यानंतर महिला आणि पुरुषांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. गावकरी गोळा होण्यापूर्वी काहींनी त्या आरोपींना बाहेर काढले आणि चोप देण्यास सुरुवात केली. पीडित महिला गतीमंद होती. यानंतर मारहाण होत असतानाच एका आरोपीने आपण त्या महिलेचा पती आहोत असे गावकऱ्यांना पटवून दिले. गावकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि महिलेच्या नातेवाइकांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. ती महिला गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. यानंतर आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...