आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातीच्या जन्मानिमित्त आजीने काढली मिरवणूक; सत्यमेव जयते वॉटर कप विजेता गावाने केले जिलेबी वाटून कन्या जन्माचे स्वागत   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव बढे- नातीच्या जन्माचे स्वागत सरपंच आजीने वाजतगाजत भव्य मिरवणूक काढून गावामध्ये जिलेबी वाटून जल्लोष व हर्षोल्लाहासात केले. तसेच बेटी बचावचा संदेशच ऐन जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त देऊन गावात एका नव्या विचाराला जन्म दिला आहे. गावात या निमित्ताने असा आदर्श सत्यमेव जयते वाटर कप रज्यस्तरीय विजेता सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांनी घालून दिला. 

 

सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांचे पुत्र विनोद कदम यांना ६ जानेवारी रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. कदम कुटुंबीय आणि सिंदखेडवासीयांनी मुलीच्या जन्माचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्याचे ठरवले. त्यासाठी गावामधून भव्य मिरवणूक काढत १२० किलो जिलेबी वाटप करण्यात आले. सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांनी गावामध्ये मुलीच्या जन्माचे बचत पत्राने स्वागत हा उपक्रम स्वखर्चाने यापूर्वी राबवला आहे. तर सरपंच यांनी फक्त सिंदखेड येथीलच नव्हे, तर परिसरातील मुलींसाठी 'मेरी बेटी, कमाएगी खुद की रोटी' या उपक्रमाअंतर्गत मुलींसाठीची संगणकीय अभ्यासक्रमाची निम्मी फी स्वत: भरून शेकडो मुलींना डिजिटल साक्षर बनवले आहे. दरवर्षी गरीब वस्तीमध्ये जाऊन भाऊबीज साजरी केली. जि. प. शाळा,अंगणवाडी येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने स्कूल बॅगचे वाटप करून त्यावर बेटी बचाव, बेटी पढावसारखे नारे छापून त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सरपंच विमल कदम यांनी केला. तर नातीच्या जन्माने जल्लोषात स्वागत करून बेटी बचाव बेटी पढाव चा आदर्श निर्माण करणे हे कृतीमधून सिद्ध केले. 

 

सकारात्मक परिणाम होतो 
जबाबदार लोकांनी स्वत:च्या अनुकरणातून एखादी गोष्ट सिद्ध केली तर, त्याचा सकारात्मक परिणाम समाज मनावर अधिक होतो. त्यामुळे परीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत केले. अर्थात नातीच्या जन्माचा सर्वाधिक आनंद झाला आहे.'' - विमल कदम, सरपंच, सिंदखेड, ता.मोताळा 
    

बातम्या आणखी आहेत...