आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी दारू प्यायल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांसह 10 जणांचा मृत्यू, 4 अधिकाऱ्यासह 12 निलंबीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाराबंकी(उत्तर प्रदेश)- येथील रानीगंज परिसरात विषारी दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 4 जण एकाच कुटुंबातील होते. ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे दारू पिल्यानंतर त्यांना दिसणे बंद झाले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळपर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय तर 10 पेक्षा जास्त लोकांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकारचे प्रकरण यावर्षीच फेब्रुवारीमध्ये सहारनपूरमध्ये घडले होते, विषारी दारू प्यायल्याने येथील 50 जणांचा मृत्यू झाला होता.


उत्पादन मंत्री जयप्रताप सिंह यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनचे चार अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश देण्या आले आहेत. यात जिल्हा उत्पादन अधिकारी शिव नारायण दुबे, उत्पादन इंस्पेक्टर राम तीरथ मौर्यसहित 3 हेड काँस्टेबल आणि 5 काँस्टेबल सामिल आहेत. डी.जी.पी. ओपी सिंहने कारवाई करत इंस्पेक्टर रामनगर राजेश कुमार सिंह आणि सी.ओ. पवन गौतमला निलंबीत केले आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत्यू झालेल्यांबद्दल आपुलकी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी डी.एम. आणि एस.पी. ला घटनास्थळी पाठवले असून मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे योगी यावेळी म्हणाले.


एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
मृत्यू झालेल्यांमध्ये छोटेलाल(60), त्यांचा मुलगा रमेश(35), दोन नातू सोनू(25) आणि मुकेश(28) हे एकाच कुटुंबातील आहे, ते रानीगंजचे रहिवासी आहेत. त्यांच्यासहतित सोनू, राजेश, पिपरी महार, राजेंद्र वर्मा, सेमराय आणि महेंद्र ततहेरा यांचाही मृत्यू झाला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...