आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुलावेसी- इंडोनेशियामध्ये एक विचित्र फेस्टीवल साजरा केला जातो. या फेस्टीवलमध्ये सहभागी होण्यासीठी लोक त्यांच्या नातेवाईकांच्या मृतदेहाला कबरेतुन खोदुन इथे आणतात. ते या मृतदेहांना सजवून चांगले कपडे घालतात आणि या फेस्टीवलमध्ये सहभागी होतात. टोराजन आदिवासी समाजाचे लोक या फेस्टीवलला साजरा करत असुन हजारो लोक हा फेस्टीवल पाहण्यासाठी येथे येत असतात. इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसी येथील टोराजा भागात होणाऱ्या फेस्टीवलला 'मॅनन हार्वेस्ट कॉर्प्स फेस्टीवल' या नावाने ही ओळखतात. हा फेस्टीवल दर तीन वर्षांनतर साजरा केला जातो.
टोराजन समाजाचे लोक या फेस्टीवलमध्ये मृतदेहांना घेऊन जाण्याअगोदर कबरेतून काढल्यानंतर काही वेळ त्या मृतदेहाला सुकवतात. त्यानंतर मृतदेहाची स्वच्छता करुन त्याला नविन कपडे घालुन या फेस्टीवलमध्ये आणतात. हे लोक मृतदेहांना गावभर मिरवून या फेस्टीवलमध्ये आणतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात रडण्यास आणि दु:खी होण्यास मनाई असल्याने यात सहभागी होणारे लोक आनंदी असतात. मागील काही वर्षांपासुन लोकांनी या फेस्टीवलमध्ये लहान मुले आणि नवजात बाळांचाही मृतदेह आणण्यास सुरुवात केली आहे. फेस्टीवलदरम्यान या गावातील दृश्य झोम्बी चित्रपटासारखे दिसते.
या फेस्टीवलला अशी झाली होती सुरुवात
या विचित्र परंपरेची सुरूवात अनेक वर्षांपुर्वी झाली होती. एका शिकाऱ्याला एक सडलेला मृतदेह सापडला त्याने त्या मृतदेहाला स्वच्छ कले आणि त्याला शर्ट घालुन दफन केले. त्यानंतर त्या शिकाऱ्याचे नशीब उजळले आणि तो श्रीमंत झाला होता. टोराजन आदिवासी समाजाच्या लोकांनी या गोष्टीची प्रेरणा घेतली आणि त्यांच्या मृत नातेवाईकांसाठी हा उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. टोराजन समाजातील लोकांच्या मतानुसार, या फेस्टीवलचे उद्दिष्ट मृत लोकांचा सन्मान करणे आहे. या फेस्टीवलदरम्यान कोणीही दु:ख व्यक्त करत नाही. हा उत्सव त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो कारण ते त्यांच्या मृत नातेवाईकांना भेटण्यासाठी ते या फेस्टीवलमध्ये येतात. या मृतदेहांना संपुर्ण गावात मिरवल्यानंतर टोराजन समाजाचे लोक म्हैस आणि डुकराचा बळी देतात. बळी दिल्याने मृत नातेवाईकांना स्वर्गात जागा मिळते असा येथील लोकांचा विश्वास आहे.
पुढील स्लाइडवर पाहा या विचित्र फेस्टीवलचे फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.