आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांनी गावातील रस्ता बनवला नाही म्हणून नागरिकांनी गाडील बांधून ओढत नेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्सिको सिटी- मॅक्सिकोमध्ये चियापास राज्यातील लास मार्गारिटासचे मेयर जॉर्ज लुइस एस्केंडन हर्नांडेजने निवडणुकीदरम्यान नागरीकांना रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले होते. आता लवकरच त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे, पण अद्याप त्यांनी रस्ता बनवला नाही. त्यांना संतप्त ग्रामस्थानी त्यांच्या कार्यालयाला घेराव घातला आणि ते बाहेर येताच त्यांना गाडीला बांधून ओढत गावभर फिरवले. गावातील संतप्त जमावाने महापौर जॉर्ज लुइस यांना एका कारला दोरीने बांधले आणि रस्त्यावर घासत गावभर फिरवले. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर पोलिस पोहचले आणि त्यांच्यासोबत झालेल्या चकमकीत 20 नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेदरम्यान पोलिसांनी 30 जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यात नागरिक महापौरांना ओढत असताना दिसत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...