Home | National | Other State | villagers spit on newly wed bride to publicly shaming in front of her husband

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सुनेसोबत परपुरुषांना करायला लावले असे काम; video व्हायरल झाल्यानंतर आत्महत्या करण्यास निघाली वधू...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:03 AM IST

काहींनी तिच्या डोक्यावरचे पदर ओढून-ओढून तिच्या चेहऱ्यावर थुंकले.

 • villagers spit on newly wed bride to publicly shaming in front of her husband

  उदयपूर - लग्नानंतर सासरी आलेल्या सुनेचे स्वागत करण्यासाठी अख्खा कुटुंब आतुर असतो. स्वागताच्या वेळी विविध प्रकारचे खेळ आणि परमपरा पार पाडून गमती जमती सुरू असतात. परंतु, राजस्थानच्या उदयपूर येथील एका नववधूसोबत जे घडले त्याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. पर-पुरुषांनी तिचे पदर ओढून अतिशय घाणेरडी वागणूक दिली. काहींनी तर तिच्या तोंडावर थुंकले सुद्धा... एवढेच नव्हे, तर सर्वांसमोर झालेल्या या अपमानाचा एक व्हिडिओ तयार करून तो गावात व्हायरल केला. हे संपूर्ण कृत्य तिच्या पतिसमोरच करण्यात आले. इतकी अमानुष वागणूक ती सहन करू शकली नाही तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सविस्तर तपास सुरू आहे.


  काय आहे प्रकरण?
  - उदयपूरच्या एका गावात व्हायरल झालेला हा व्हिडिओ 11 ऑक्टोबरचा आहे. या घटनेचा व्हिडिओ इतका पसरवण्यात आला की तो नुकताच या पीडितेच्या मोबाईलवर सुद्धा आला. आपल्या नावासह पसरवल्या जाणारा हा व्हिडिओ पाहून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
  - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नववधूच्या पतीने 2015 मध्ये गावातील मुख्य आरोपी कुलदीप चौहाण याला 2.5 लाख रुपये कर्ज दिले होते. कित्येक दिवसांपासून तो आपले पैसे मिळवण्याचे प्रयत्न करत होता. आपल्या लग्नाच्या वेळी सुद्धा त्याने कुलदीपला फोन लावून विनवण्या केल्या. परंतु, तो पैसे फेडण्यास तयारच नव्हता.
  - लग्नाच्या एका दिवसापूर्वी पीडितेचा पती आणि कुलदीप यांच्यात प्रचंड वाद झाला. यानंतर पीडितेच्या पतीने कुलदीपच्या घरात जाऊन कुलदीपला लपविणाऱ्या त्याच्या कुटुंबातील महिलांना रागात शिवीगाळ केली. यानंतर तो घरी परतला आणि लग्नाच्या तयारीला लागला. परंतु, कुलदीपने या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरवले होते.


  घटनेच्या दिवशी झाले असे काही...
  पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्न होताच आरोपी कुलदीप पंचायतीचे काही लोक घेऊन पीडित तरुणी आणि तिच्या पतीकडे पोहोचला. यावेळी आरोपीसोबत त्याच्या घरातील महिला सुद्धा होत्या. त्या सर्वांनी मिळून आधी पीडितेच्या पतीला मारहाण केली. यानंतर नवविवाहितेला बळजबरी त्या सर्वच पुरुषांचे पाय स्पर्श करून माफी मागायला भाग पाडले. इतक्यातही कुलदीपचा राग शांत झाला नाही. त्याच्या गुंडांनी संतापात नववधूचे पद आणि साडी ओढून तिचा अपमान केला. तर काहींनी तिच्या डोक्यावरचे पदर ओढून-ओढून तिच्या चेहऱ्यावर थुंकले. यात काहींनी घटनेचा व्हिडिओ शूट करून गावात व्हायरल केला.

Trending