आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vin Diesel's Stunt Double, Dropped From 30 Feet, Due To Head Injury Goes In Coma

30 फूट उंचीवरून खाली पडला विन डीजलचा स्टंट डबल जो, डोक्याला लागलेल्या जबर मारामुळे गेला कोमात 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : स्टंट डबल जो वॉट्स 30 फूट उंचीवरून डोक्यावर पडला. त्यामुळे जोच्या डोक्याला जबर मर लागला आहे आणि त्यामुळे तो कोमामढेब गेला आहे. झाले असे की, जो ज्या सेफ्टी केबलच्या आधाराने हा स्टंट करत होता, ती तुटली आणि हि दुर्घटना घडली. ही घटना इंग्लंडच्या लीव्सडेन येथील वॉनर्स ब्रदर्सच्या स्टूडियोमध्ये घडली.  

 

विन डीजल करणार होता शूट... 
हा चित्रपटातील एक क्राइम सीन होता, जो बाल्कनीमध्ये शूट केला जात होता. विन डीजलदेखील घटनेकच्या काही सेकंदांनंतर तिथे पोहोचला. घटनेनेनंतर तो त्याला खूप मोठा डाक्का बसला आहे. दुर्घटनेनंतर शूटिंग थांबवले गेले आणि लगेच जोला रॉयल लंडन हॉस्पिटलमध्ये नेले गेले. ही घटना 22 जुलैला दुपारी घडली.  

 

यापूर्वीही झाल्या आहेत दोन घटना... 
ही पहिली वेळ नाहीये जेव्हा विन डीजलच्या एखाद्या स्टंट डबलसोबत अशी घटना घडली असेल. यापूर्वी 2002 मध्येदेखील हॅरी ओ कॉनर पॅरा-सेलिंग सीनच्या शूटिंगदरम्यान दुर्घटनेचा शिकार झाला होता. विनचा चित्रपट 'फास्ट अँड फ्यूरियस 9', ज्यामध्ये मिशेल रोड्रिग्ज, हेलेन मिरेन, चार्लीज़ थेरॉन आणि जॉन सीना सामील होते, तो पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...