आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनिवारी शनिदेवासोबतच करावी श्रीगणेशाची पूजा, आज विनायक चतुर्थी व्रत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 30 नोव्हेंबरला मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. यालाच विनायकी चतुर्थी म्हणतात. या तिथिला श्रीगणेशासाठी व्रत-उपवास केले जाते. ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनिवारी शनिदेवाचीही विशेष पूजा केली जाते. यावेळी शनिवार आणि चतुर्थी योग जुळून आल्यामुळे शनिदेवासोबतच श्रीगणेशाची विशेष पूजा करावी.

  • अशाप्रकारे करा श्रीगणेशाची पूजा

सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हा, सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीची गणेश मूर्ती स्थापित करा. त्यानंतर लाल चंदन, गुलाल, लाल फुल, वस्त्र, फळ इ. पूजा सामग्रीने गणपतीची पूजा करा. देवाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास घरी ब्राह्मणांना जेवणाचे आमंत्रण देऊन जेवू घालावे, दक्षिणा द्यावी.

  • दुर्वा अर्पण खालील मंत्राचा उच्चार करावा

मंत्र - ॐ गणाधिपाय नम:। ॐ विनायकाय नम:। ॐ विघ्रनाशाय नम:। ॐ एकदंताय नम:। ॐ उमापुत्राय नम:। ॐ सर्वसिद्धिप्रदाय नम:। ॐ ईशपुत्राय नम:। ॐ मूषकवाहनाय नम:। ॐ इभवक्त्राय नम:। ॐ कुमारगुरवे नम:। दुर्वा अर्पण केल्यानंतर गणपतीची आरती करावी.

  • शनिदेवाला अर्पण करावे निळे फुल

पं. शर्मा यांच्यानुसार शनिदेवाचे रूप निळे सांगण्यात आले आहे. यामुळे शनिदेवाला निळे वस्त्र आणि फुल अर्पण केले जाते. शनिदेवासाठी तेलाचे दान केले जाते. शनिवारी शनिदेवाला निळ्या रंगाचे फुल अवश्य अर्पण करावे.

बातम्या आणखी आहेत...