आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक चतुर्थी व्रत 27 फेब्रुवारीला, या विधीनुसार करावे व्रत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत म्हटले जाते. हे व्रत केल्याने रिद्धी-सिद्धी आणि सर्व सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतात. या महिन्यात हे व्रत फाल्गुन मासातील शुक्ल पक्ष चतुर्थी (27 फेब्रुवारी)ला आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. श्रीगणेशाचे नाव विनायक असल्याने याला विनायक चतुर्थी म्हटले जाते. काही भक्त विनायक चतुर्थी व्रत वरद विनायक चतुर्थी स्वरूपातही करतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. विनायक चतुर्थी व्रत मंगळवारी आले तर याला अंगारक गणेश चतुर्थी म्हटले जाते.

  • विनायक चतुर्थी पूजा विधी

> विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. > त्यानंतर श्रीगणेश मूर्तीसमोर बसून किंवा मंदिरात जाऊन व्रत आणि पूजा संकल्प घ्यावा. > श्रीगणेशाची विधिव्रत पूजा करावी. > दिवसभर नियम आणि संयमात राहून व्रत करावे. > संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी स्नान करून पुन्हा एकदा श्रीगणेशाची पूजा करावी. > संध्याकाळी चंद्राची पूजा करून दर्शन घ्यावे. > त्यानंतर संपूर्ण कुटुंबासोबत बसून फलाहार घ्यावा किंवा जेवण करावे.