आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनायक चतुर्थी 30 नोव्हेंबरला, हे व्रत केल्याने श्रीगणेश पूर्ण करतात मनातील इच्छा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी विनायकी चर्तुर्थीचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष मासातील चतुर्थी तिथीला गणेश पूजेचे विशेष महत्त्व आहे. हे व्रत या महिन्यात 30 तारखेला शनिवारी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. जीवनात उष्ण प्राप्त होते. - सकाळी लवकर उठून अंघोळ करुन घ्या. तुमच्या इच्छेनुसार सोने, चांदी, तांबे, पीतळ किंवा मातीच्या मूर्तीची स्थापना करा.  - त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करावी. श्रीगणेशाला लाल फुल, गुलाल अर्पण करावा. गणेश मंत्र (ऊं गं गणपतयै नम:) चा उच्चार करत 21 दुर्वा अर्पण करा. - श्रीगणेशाला 21 लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये 5 मोदक मूर्तीजवळ ठेवावेत आणि पाच ब्राह्मणांना दान करावेत. इतर मोदक प्रसाद स्वरूपात इतरांना वाटून टाकावेत. - पूजेमध्ये गणपती स्त्रोत, अथर्वशीर्ष, संकटनाशक स्त्रोत आदिचा पाठ करा. - ब्राह्मणांना जेवू घालून दक्षिणा द्यावी. संध्याकाळी स्वतः जेवण करावे. शक्य असल्यास उपवास करावा.

  • विनायक चतुर्थीचे महत्त्व

विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते. देवाकडून आपली कोणतीही इच्छा पूर्तीच्या आशिर्वादाला वरद म्हणतात. जे भक्त विनायक चतुर्थीचा उपवास करतात त्यांना श्रीगणेश ज्ञान आणि धैर्याचा आशीर्वाद देतात. ज्या मनुष्याकडे हे गुण असतात तो जीवनात खूप प्रगती करतो आणि त्याला मनासारखे फळंही प्राप्त होते.

बातम्या आणखी आहेत...