आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनेश फोगाटचा पराक्रम: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ठरली देशातील पहिला महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता- विनेश फोगाट (२३) आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी देशातील पहिली महिला ठरली. तसेच एशियाड व राष्ट्रकुल स्पर्धांत सुवर्ण जिंकणारीही ती पहिलीच आहे. ती राष्ट्रकुल महिला कुस्तीत देशाला पहिले सुवर्ण मिळवून देणाऱ्या गीता फोगाटची चुलत बहीण आहे. प्री-क्वार्टरमध्ये विनेशने चीनच्या सुन यानन हिला हरवले. रिओ ऑलिम्पिकमध्ये याच सुनविरुद्ध खेळताना विनेशचा पाय मोडला होता. त्यानंतर वर्षभर विनेश फोगाट कुस्तीपासून लांबच होती. 


लढतीआधी महावीर फोगाट यांचे ट्विट
एक गोष्ट लक्षात ठेव मुली! सुवर्ण जिंकले तर आदर्श ठरशील. आदर्श विसरले जात नाहीत, ते नेहमीच लक्षात राहतात. देशाचा झेंडा उंचावर न्यायचा आहे. 

 

४ लढतींत ३५ गुण, चारही प्रतिस्पर्धी चारच गुण मिळवू शकल्या
प्री-क्वार्टर :
८-२ गुणांनी रिअोचा हिशेब चुकता | चीनच्या  सुनवर आधीपासूनच पूर्ण नियंत्रण ठेवले होते.
क्वार्टर : तांत्रिक गुणांवर ११-० ने विजय | कोरियन किमवर ११ गुणांची बढत.१.२३ मिनिटांआधीच विजयी झाली.
सेेमी: फितले डावावरून ७५ सेकंदांत चीत केले | उझबेकच्या दोलेतबाइकला १०-० ने धूळ चारली.
फायनल : युकीला ६-२ ने हरवले | विनेशने पहिल्या फेरीत ४-ने आघाडी घेतली. युकीला ५ व्या मिनिटाला १ गुण. विनेश लढत संपण्याआधी ३ सेकंदांआधी २ गुण मिळवत ६-२ ने विजयी.


> योगेश्वर दत्तने याच डावावर ब्राँझ (लंडन ऑलिम्पिक, २०१२) जिंकले होते. विनेश व तिची बहीण रितुने गतवर्षी एशियन चॅम्पियनशिपमध्ये याच डावाने पदके जिंकली.

 

योगेश्वर दत्तचा फितले डाव, जगातील एकाही कोचला अनेक दशकांपासून या डावावर तोड शोधता आला नाही
फितले डाव १०० वर्षांपूर्वीच भारतात तयार झाला. जेव्हा प्रतिस्पर्धी छातीवर पडलेला असतो तेव्हा हा डाव लावला जातो. या स्थितीत मल्लाच्या दोन्ही पायांचे पंजे पकडून त्याला सलग पलटी देत चीत केले जाते. मात्र सर्वच मल्लांना तो खेळता येत नाही. आजवर जगात कुठेही या डावाला तोड शोधता आलेला नाही, हे त्याचे वैशिष्ट्य.

बातम्या आणखी आहेत...