आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद चांदणेचा मृतदेह 10 दिवसांनी आढळला, आंदोलनानंतर मुख्य आरोपीला पंढरपुरात अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहूर/जामनेर- वाकडी ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणेचा मृतदेह गुरूवारी (ता. २८ रोजी) छातीवर दगड बांधलेल्या अवस्थेत पाचोरा तालुक्यातील मोहाडी शिवारात एका निर्जन विहिरीत आढळून आला. त्यानंतर याप्रकरणी प्रमुख संशयित चंद्रशेखर वाणी यास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत समाजबांधवांनी जळगाव येथे आंदोलन केले. अखेर पोलिसांनी चंद्रशेखर वाणी याला पंढरपूर येथून गुरूवारी अटक केली. दरम्यान, याप्रकरणातील संशयित प्रदीप राजपूत फरार आहे.

१९ मार्चपासून बेपत्ता झालेल्या विनोद चांदणेचा मृतदेह पाचोरा तालुक्यातील मोहाडी शिवारात आढळला. बुधवारी सायंकाळी रमेश रामसिंग पाटील बऱ्याच दिवसानंतर मोहाडी साजगाव रस्त्यावरील शेतात एका रोपट्याला पाणी देण्यासाठी गेले. यावेळी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता पाण्याबाहेर पाय तरंगत असताना दिसून आले.

याबाबत त्यांनी पोलिस पाटील विजय पवार यांना माहिती दिली. तर मिळालेली माहिती पवार यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यास कळवली. वाकडी येथील चांदणे बेपत्ता असल्याने कदाचीत हे प्रेत विनोदचे असावे असा संशय पोलिसांना आला.

पोलिस घटनास्थळी
त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पहूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. अटकेतील आरोपीने दिलेल्या माहितीप्रमाणे मृतदेह आढळून आल्याने तो विनोद चांदणेचाच असल्याची पोलिसांची खात्री पटली. त्यानुसार कुटुंबीयांना बोलावले.

मृतदेह विनोदचाच असल्याचे भाऊ राजेंद्र, बालू व विजय यांनी स्पष्ट केले. यानंतर मृतदेह जळगावला शवविच्छेदनासाठी नेला. अप्पर पोलिस अधीक्षक किरण बच्छाव, डीवायएसपी ईश्वर कातकडे, गजेंद्र पाटील, दिलीप शिरसाठ उपस्थित होते.

'मुर्दाबाद'च्या घोषणा
मुख्य आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबीय व समाजबांधवांनी घेतला होता. दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मागणी माध्यमांसमोर केली होती. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी विनंती केली होती. यावेळी संतप्त समाजबांधवांनी प्रचंड घोषणा देत आंदोलन केले. आंदोलकांनी 'गिरीश महाजन मुर्दाबाद'च्या घोषणाही दिल्या. आंदोलकांना समर्थन देण्यासाठी माजी खासदार उल्हास पाटील हे रुग्णालयात आले होते. दरम्यान, सायंकाळी मुख्य आरोपी वाणी याला अटक करण्यात आली. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी फोनवरुन संपर्क साधल्यानंतर आंदोलकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, रुग्णालयात तणाव झाला होता.

जिल्हा रुग्णालयात आंदोलन आणि तणाव

बातम्या आणखी आहेत...