आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षांपूर्वी जेव्हा झाला होता विनोेद मेहरांचा मृत्यू तेव्हा दोन वर्षांचीही नव्हती मुलगी, आजी-आजोबांकडे झाली लहानाची मोठी, मुलाने केले आहे सैफच्या फिल्ममधून डेब्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेता विनोद मेहरा यांना या जगाचा निरोप घेऊन 28 वर्षांचा काळ लोटला आहे. 30 ऑक्टोबर 1990 रोजी हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले होते. जेव्हा विनोद मेहरांचे निधन झाले, तेव्हा त्यांची मुलगी सानिया ही दोन वर्षांपेक्षाही लहान होती. 2 डिसेंबर 1988 रोजी जन्मलेली सोनिया ही विनोद यांची तिसरी पत्नी किरण यांची मुलगी आहे. विनोद यांनी एकुण चार लग्न केले होते. पण एकीला कधीही पत्नीचा दर्जा मिळाला नाही. 


विवाहित असताना अभिनेत्रीसोबत होते अफेअर...
विनोद यांनी पहिले लग्न त्यांच्या आईच्या पसंतीने मीना ब्रोकासोबत केले होते. लग्नाच्या काही दिवसांतच विनोद यांना मायनर हार्ट अटॅक आला होता. बरे झाल्यानंतर त्यांचे अफेअर अभिनेत्री बिंदिया गोस्वामीसोबत सुरु झाले होते, दोघांनी लग्नही केले होते. पण केवळ चार वर्षे हे नाते टिकले आणि दोघे वेगळे झाले. विनोद यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर बिंदियाने दिग्दर्शक जेपी दत्तांसोबत लग्न केले. बिंदियापासून वेगळे झाल्यानंतर विनोद यांनी किरणसोबत तिसरे लग्न केले. किरणपासून त्यांना सोनिया ही एक मुलगी आणि रोहन हा मुलगा झाला.

 

विनोद मेहरांच्या एका पत्नीला कधीही मिळाला नाही पत्नीचा दर्जा...

यासीर उस्मान यांच्या 'रेखा: एन अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार, विनोद मेहरांनी अभिनेत्री रेखासोबत लग्न केले होते. कोलकाता येथे लग्न करुन जेव्हा रेखा विनोद मेहरांच्या घरी पोहोचल्या, तेव्हा विनोद यांच्या मातोश्री कमला मेहरा त्यांच्यावर प्रचंड वैतागल्या होत्या. कमला मेहरा यांनी रागात येऊन रेखा यांच्यावर चप्पल काढली होती. रेखा त्यांच्या पाया पडायला वाकल्या, तर त्यांनी रेखाला धक्का मारुन बाजुला केले होते. रेखा घराच्या दारातच उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांच्या सासूबाई त्यांना शिवीगाळ करत होत्या. विनोद मेहरांनी मध्यस्थी करुन आईला समजावण्याचा प्रयत्न केला आणि रेखाला त्यांच्या घरी परत जायला सांगितले. कालांतराने हे लग्नही तुटले.

 

आजी-आजोबांच्या घरी लहानाची मोठी झाली विनोेद मेहरांची मुले...

वयाच्या 45 व्या वर्षी विनोद मेहरा यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी किरण मुलांसोबत केन्याला शिफ्ट झाली होती. त्यांची मुलगी सोनिया आजी-आजोबांकडेच वाढली. केन्या आणि लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करणा-या सोनियाने वयाच्या 8 व्या वर्षी अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. तिला लंडन अॅकेडमी ऑफ म्युझिक अँड ड्रामेटिक आर्ट्समध्ये अॅक्टिंग एग्जामिनेशनमध्ये गोल्ड मेडल मिळाले होते. वयाच्या 17 व्या वर्षी सोनिया मुंबईत आली आणि अनुपम खेर यांच्या अॅक्टर प्रीपेअर्स या इन्स्टिट्युटमध्ये 3 महिन्यांचा अभिनयाचा कोर्स केला. अभिनेत्रीसोबतच सोनिया एक ट्रेंड डान्सरही आहे.

 

11 वर्षांपूर्वी  सोनियाने केले होते बॉलिवूड डेब्यू...

सोनियाने 2007 मध्ये दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या 'विक्टोरिया नं. 203' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. हा चित्रपट 1972 मध्ये आलेल्या याच नावाच्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक होता.  'विक्टोरिया नं. 203'मध्ये सोनियासह अनुपम खेर, ओम पुरी, जिमी शेरगिल आणि जॉनी लीव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. सोनियाने आतापर्यंत चार चित्रपटात काम केले आहे. अखेरची ती 'रागिनी एमएमएस 2' (2014) मध्ये झळकली होती. तान्या कपूरचे पात्र तिने या चित्रपटात साकारले होते. चित्रपटांसोबतच ती टीव्हीवरही काम करते. एमटीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये (एमटीव्ही ग्राइंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाइल चेक) मध्ये ती  VJ म्हणून झळकली.

 

सैफच्या चित्रपटातून विनोद मेहरांच्या मुलाने केले डेब्यू...

विनोद मेहरांचा मुलगा रोहनने सैफ अली खानच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'बाजार' या चित्रपटातून डेब्यू केले आहे. चित्रपटात रोहनने रिजवान अहमदची भूमिका वठवली आहे. चित्रांगदा सिंग आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...