आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ऐपत नसेल तर शिकू नको, नाेकरी कर\', शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; माफी मागून मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची केली मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - 'ऐपत नसेल तर शिकू नको, नाेकरी कर' असे वादग्रस्त वक्तव्य एका विद्यार्थ्याबाबत केल्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात बुधवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 

 

समाजातील सर्वस्तरातील विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे. त्यासाठी शासनाने केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत करावे, या आशयाचा प्रश्न प्रशांत राठोड या विद्यार्थ्याने शिक्षणमंत्री तावडे यांना िवचारला होता. या वेळी शिक्षणमंत्री यांनी विद्यार्थ्याला उद्देशून ऐपत नसेल तर शिकू नको, नोकरी कर असे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले होते. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. या प्रकाराचे चित्रीकरण करीत असलेल्या युवराज दाभाडे या विद्यार्थ्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली. शिक्षण व विद्यार्थ्यांबाबत एवढी नकारात्मक भूमिका असलेल्या तावडे यांना शिक्षणमंत्रीपद देणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. त्यांचा विद्यार्थ्यांनी जाहीर निषेध केला. तसेच वादग्रस्त वक्तव्याबाबत तावडे यांनी माफी मागून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे. या प्रसंगी विकास मोरे, पीयूष तोडकर, भूषण धनगर, तुषार सूर्यवंशी, सागर जाधव, मुकेश पाटील, राजेश पवार, पल्लवी पाटील, दीपाली भालेराव आदी विद्यार्थी उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...