आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vinod Viplav Writer Of Mohammed Rafi Biography Shared In Emergency, Rafi Saheb Had Helped To Remove Ban On Kishore Kumar Without Knowing Him.

इमरजन्सीमध्ये रफी ​​साहेबांनी किशोर कुमार यांच्यावर असलेली बंदी त्यांच्या नकळत काढून टाकली होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमेश कुमार उपाध्याय, मुंबईः  24 डिसेंबर रोजी प्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची 95 वी जयंती आहे. रफी ​​साहेबांवर 2005 मध्ये बायोग्राफी लिहिणा-या विनोद विप्लव यांनी त्यांच्या वाढदिवशी काही रोचक कथा सांगितल्या.
विप्लव यांनी सांगितले,  "आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. एकदा रफी साहेब काही कामानिमित्त दिल्लीला आले तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींची भेट घेतली. संभाषणात त्यांनी इंदिरा गांधींना किशोर कुमार यांच्या गाण्यांवर असलेली बंदी काढण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून इंदिरा गांधींनी बंदी उठवली. त्यानंतर किशोर कुमारची गाणी आकाशवाणीवर वाजू लागली."


विप्लव यांनी पुढे सांगितले... 

  • किशोर कुमार यांना अचानक त्यांच्या गाण्यांवरील बंदी उठल्याचे कळताच त्यांनी त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. हे सर्व रफी साहेबांमुळे झाल्याचे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी रफी साहेबांची भेट घेतली. ते म्हणाला की, तुम्ही मला खूप मदत केली आणि याबाबत काही संकेतही दिले नाही. रफी म्हणाले की, ही खूप लहान गोष्ट आहे. मी तुम्हाला मदत केली असे कुणालाही सांगू नका. रफी साहेबांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला गेलेले किशोर कुमार बराच वेळ रडले होते. तेथे त्यांनी खुलासा केला की, रफी साहेब आता आपल्यात नाहीत, त्यांनी मला घातलेली शपथ मोडतो. यावेळी किशोर कुमार यांनी रफी साहेबांनी त्यांना कशाप्रकारे मदत केली, याचा खुलासा केला होता.
  • कमल राजस्थानी हे एक संगीतकार होते. संघर्षाच्या वेळी, ते एका निर्मात्यास भेटले आणि त्यांना काम देण्याची विनंती केली. निर्मात्याने कमल यांच्यासमोर एक अट ठेवली की, रफी साहेब जर गायला तयार असतील तर तुम्हाला नक्की काम मिळेल. ते रफी साहेब यांना भेटले आणि सर्व काही सांगितले. रफी यांनी त्यांना एक तारीख दिली. निर्मात्यांनादेखील आश्चर्य वाटले की, ज्याला कुणीही ओळखत नाहीत, त्याच्यासाठी रफी साहेब गाणे गाण्यास तयार झाले.
  • जेव्हा राजस्थानी साहेब यांना कामाचा मोबदला मिळाला तेव्हा ते रफी साहेबांकडे पोहोचले. रफी साहेबांनी त्यांना मोबदला परत केला आणि म्हणाले की, तुम्ही ते ठेवा आणि या पैशातून शूज आणि कपडे घ्या. कारण मुंबई एक देखाव्याचे जग आहे. जर आपण येथे चांगले कपडे परिधान केले नाही तर कोणीही काम देणार नाही. म्हणण्याचा अर्थ असा की, रफी साहेब खूप चांगले मनाचे होते. त्यांच्यात अजिबात अहंकार नव्हता. लोकांना मदत करणे त्यांच्या स्वभावात होते. त्यांना तीन मुली आहेत. मुलींच्या पाठवणीवेळी ते रडेल नाहीत. पण 'बाबुल की दुआएं लेती जा... जा तुझको सुखी संसार मिले ...' या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर ते खूप रडले होते.